राधानगरीचं 'गोकुळ' मा.श्री अभिजीत तायशेटे विक्रमी मतांनी विजयी.



कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे

संपर्क ; 9766498212

कोणताही राजकीय वारसा नसताना कार्य हिच ओळख असणाऱ्या जनतेच्या आशीर्वादावर उदयास आलेलं लोकप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिजीत तायशेटे होय.ज्यांच्या नावातच *जीत* आहे असे *अभिजीत तायशेटे*  यांना गोकुळ तिकीट मिळालं तेव्हाच सिट फिक्स फक्त लीड किती?असा सुर राधानगरी तालुक्यातुन येत होता.अर्थात त्यामागे कठोर परिश्रम, कामाची वेगळी पद्धत, वक्रतुंड उद्योग आणि शिक्षण समुहाच्या माध्यमातून तालुक्यात केलेलं अतुलनीय काम आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती म्हणुन केलेले दैदिप्यमान कार्य इत्यादींचा अनुभव सोबतीला होताच.

राजकारण,सामाजिक कार्य,शिक्षण,उद्योग अशा सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आणि जनसामान्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेल्या अभिजीत तायशेटे यांच्या विजयाने राधानगरी आणि कोल्हापुर जिल्ह्यातील सामान्य वर्गाला संधी मिळाल्याच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत.तसे पाहता अभिजीत तायशेटे यांच्यासाठी गोकुळ ची हि निवडणूक सहकारातील पहिलीच निवडणूक होती आणि अगदी नियोजनबद्धरित्या १९७२ इतकी एकूण उमेदवारांमध्ये क्रमांक 2 ची विक्रमी मते मिळवुन मोठी दूरदृष्टी असलेला कसदार लोकप्रतिनिधी जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ मध्ये जात आहे याचा आनंद होतो आहे.

अर्थात ह्या विजया मागे राजर्षी शाहु आघाडीचे सर्वेसर्वा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,जिल्हा काँग्रेस (आय) चे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील,शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबीटकर,खासदार संजय मंडलिक,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील,के.पी.पाटील,अरुण डोंगळे, मारुतीराव जाधव, विजयसिंह मोरे, सदाशिव चरापले आणि सर्वच आघाडीचे प्रमुख नेते त्याचबरोबर राधानगरीतील तरुण मंडळे आणि युवा कार्यकर्ते यांच्यामुळेच विजयश्री खेचुन आणण्यात यश आल्याचे ते बोलत होते.

त्याचबरोबर दुध उत्पादकांनी आपल्या हक्काचा माणुस म्हणुन आपण केलेल्या मतदान रुपी सहकार्याबद्दल सर्व ठराव धारक  मतदारांचे आभार.

काम करणाऱ्या,सुसंस्कृत,शालीन उद्यमशील नेतृत्वाचा राधानगरी पं.समिती, फेजीवडे पं.समिती आणि राधानगरी जिल्हा परिषद सदस्य आणि आजचा हा गोकुळ असे अपराजित अभिजीत तायशेटे यांच्या विजयात सहभागी होता आल्याने कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या