*उस्मानाबाद* :- *सन 2013 मधील खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत राज्य पोलीस दलातील सुमारे 18 हजार पोलीस हवालदार उत्तीर्ण झाले होते, त्यावेळी टप्प्याटप्प्याने सुमारे 6 ते 7 हजार पोलीस हवालदारांना त्यांच्या जेष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आदेश दिले होते*
*त्यानंतर पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून या विषयाबद्दल निवेदने दिली गेली होती, तसेच डिसेंबर 2019 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विराट मोर्चा काढून तत्कालीन तात्पुरत्या स्वरूपात गृहमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते, त्यानंतर गृहमंत्री पद अनिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले होते*
*त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फक्त 1061 जणांनाच नियुक्ती आदेश दिले होते ,त्याच्यानंतर या विषयाकडे कोणीही लक्ष दिले नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीत जवळजवळ 8 ते 9 हजार पोलीस हवालदार हे नियुक्ती आदेशाची चातका प्रमाणे वाट पाहत आहेत. यामधील काही पोलीस हवालदार हे सेवानिवृत्त झाले आहेत, काहीजण मयत झाले आहेत, तर काहीजण सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर उभे आहेत*
*त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या विषयाकडे स्वतः जातीने लक्ष देऊन उरलेल्या 8 ते 9 हजार पोलीस हवालदारांची जेष्ठता न पाहता त्या सर्वांनाच सरसकट नियुक्ती आदेश देऊन त्यांचे पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे , असेही या निवेदनात पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी म्हटले आहे*


0 टिप्पण्या