पळसगाव //बु//ग्रामपंचायत च्या प्रभाग १ मधून भारती कोंडविलकर बिनविरोध.

 पळसगाव //बु//ग्रामपंचायत च्या प्रभाग १ मधून भारती कोंडविलकर बिनविरोध.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. २६-  माणगांव तालुक्यातील रायगडच्या पायथ्याशी असलेली ग्रामपंचायत म्हणजे पळसगाव बुद्रुक ग्रामपंचायत या ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक १ मधून ग्रामविकास आघाडीच्या भारती विठोबा कोंडविलकर ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत हा प्रभाग एकूण ५९१ मतदारांचा आहे.

 पळसगाव बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये पळसगाव बुद्रुक, आमरे वाडी, घरोशीवाडी, घरोशी, पळसगावं आदिवासी वाडी, तेल्याचीवाडी, रोहिदास वाडी, पळसगाव बौध्दवाडी अश्या गाव -वाडी -वस्त्यांचा समावेश आहे.  तर प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या सौ भारती विठोबा कोंडविलकर यांनी गावातील जेष्ठ समाजसेवक विजय (भाई) आमरे व सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामनिर्देशन सादर केले होते त्याला १००% निर्विवाद यश मिळाले आहे.

पळसगाव बुद्रुक च्या प्रभाग क्रमांक १ मधून बिनविरोध  निवडुन आलेल्या सदस्या सौ भारती विठोबा कोंडविलकर ह्या ग्रामविकास आघाडीच्या सदस्या असल्याचे जेष्ठ समाजसेवक विजय भाई आमरे,व अशोक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सर्व पळसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी तील सर्व ग्रामस्थांनी बिनविरोध विजयी उमेदवार सौ भारती विठोबा कोंडविलकर यांचे अभिनंदन केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या