मोर्बा ग्रामपंचायत मध्ये पुरोगामी विचारसरणीचा विजय होणार

 मोर्बा ग्रामपंचायत मध्ये पुरोगामी विचारसरणीचा विजय होणार

मोर्बा ग्रामपंचायत सरपंच पदी शाहिद राऊतच  निवडून येणार-शेकाप नेते अस्लम राऊत.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव दि. २९-  तालुक्यातील सर्वात अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या मोर्बा ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी (तटकरे गट) आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आहे. यामध्ये धार्मिक पक्षाना किंवा धार्मिक विचारांच्या पक्षासोबत गेलेल्या पक्षांना मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील मतदार स्वीकारणार नाही. त्यामुळे मोर्बा मतदारराजा हा पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे विकासात्मक दृष्टिकोनातून शेकापच्या पाठीमागे कायम आहे आणि कायमच राहणार अशी ग्वाही शेकाप जेष्ठ नेते तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अस्लमभाई राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

शेतकरी कामगार पक्षाकडून सरपंच पदाचे देण्यात आलेले उमेदवार शाहीद राऊत हे मोर्बाच नव्हे तर माणगांव तालुक्यातील बहुतांशी युवा वर्गाचे आशास्थान आहे. त्यांनी मागील ५ वर्षात मोर्बा ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यात त्यांना यश देखील आले आहे. त्यामुळे लढत चौरंगी दिसत असली तरी ही लढत धार्मिक पक्षाबरोबर गेलेले पक्ष सर्वधर्म समभाव जपणारा पुरोगामी विचारांचा पक्ष अशी असल्याची चर्चा मोर्बा विभागात सुरू आहे.

मोर्बा ग्रामपंचायत हद्दीमध्ये ६ प्रभामधून १७ सदस्य व एक थेट जनतेतून सरपंच अशी आकडेवारी आहे. यामध्ये मोर्बा, सुरले, बोर्ले, नाईटणे, महादपोली एकूण ९ गावे व वाड्या यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायत मध्ये सुमारे ६५०० हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच ही निवडणूक आम्ही इंडिया आघाडीच्या तत्वानुसार लढवीत असल्याचे शेकाप जेष्ठ नेते अस्लम राऊत व सरपंच पदाचे उमेदवार शाहिद राऊत यांनी सांगितले आहे. तसेच शाहिद राऊत यांची निशाणी खटारा असल्याने शेकाप पक्षाची निशाणी या शेकापच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला मिळाल्यामुळे मोर्बा गावातील मतदारांमध्ये कमालीचा  उत्साह निर्माण झाला आहे.

मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शेकाप उमेदवारांना शेकाप जेष्ठ नेते आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील जेष्ठ नेते अस्लम राऊत यांच्यासह मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग निहाय जेष्ठ शेकाप कार्यकर्ते मुश्ताक राऊत, हसनमिया बंदरकर, नारायण मेस्त्री, माजी सरपंच विलास गोठल, अनंत दगडू खराडे, प्रकाश ओव्हाळ, अमोल मोहिते, वैभव डवले, आरिफ राऊत, अन्नू धनसे, सुहेल धनसे, शेकाप जेष्ठ नेते निजाम फोपलुनकर, बशीर फिरफिरे, याकूब चिलवान, उमर चिलवान, अय्यान मुल्ला आदी नागरीकांनी सशर्त पाठींबा दिल्याने यावर्षी मोर्बा ग्रामपंचायत वर यावर्षी निर्विवाद लाल बावटा फडकणार अशी चर्चा मोर्बा विभागात रंगली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या