पांचाळ सोनार समाज महामंडळ - राज्य युवा अध्यक्षपदी रवी पोतदार यांची निवड..
महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळ गेली अनेक वर्ष सोनार समाज संघटना बरोबरच इतर अनेक सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्रीडा, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. सोनार समाजातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ही समाजातील शिखर संस्था म्हणून मानली जाते.
या महामंडळ शिखर संस्थेची सुरुवात पंढरपूर जवळील मोडनिंब या गावातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक धनंजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी केली.यांनी लावलेल्या या बीजाचे रुपांतर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोपट्यामध्ये झालेलं दिसत आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संघटन वाढीसाठी जिल्हा तालुका व विभाग या परिक्षेत्रा मध्ये पदाधिकारी निवडी केल्या जात आहेत.
यातूनच कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी शहरांमधील रवी पोतदार यांची राज्य युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
रवी पोतदार यांची इचलकरंजी शहर प्रमुख या पदापासून सुरुवात झाली. यानंतर आपल्या सामाजिक कार्यातून तसेच पोलीस मित्र या संघटनेतून त्यांनी अनेक लोकांना सहकार्य करून आपले कार्य सिद्ध करून दाखवले. 2019 मधील पूर परिस्थिती असो किंवा 2020 मधील कोरोना परिस्थिती यामध्ये त्यांनी सामान्य गरजू व्यक्तींना मोलाची सहकार्य केल आहे..
निगर्वी,मनमिळावू असे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण समाजामध्ये त्यांची ओळख आहे त्यांच्या या निवडीतून सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या या पदाचा पुढील काळात समाजातील युवकांच्या मध्ये सामाजिक व सहकार्याची भावना जागृत करून कृतिशील सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन रवी पोतदार यांनी केले..


0 टिप्पण्या