माणगांव मधील वारक ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत.
माणगांवमधील वारकमध्ये कौन बनणार सरपंच? वैष्णव साठे की ऍड. दिनेश वारेकर?
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २०-माणगांव तालुक्यातील महत्त्वाची असणाऱ्या वारक ग्रामपंचायतमध्ये विघवली, वारक व कुशेडे या ३ गावांचा सामावेश होतो. यामध्ये वारक अदिवासी वाडी व बौद्धवाडी अशी गावे देखील समाविष्ट आहेत. यामध्ये ३ प्रभागांतुन ९ सदस्य व थेट जनतेतून १ सरपंच अशी सदस्य संख्या आहे. यामध्ये युवा नेतृत्व वैष्णव साठे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर याच ग्रामपंचायतमध्ये ऍड दिनेश वारेकर यांनी देखील सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीच्या दोन्ही वेगवेगळ्या गटातील नसून राष्ट्रवादीच्या खासदार सुनिल तटकरे गटातील असल्याने वारक ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी चर्चा रंगली आहे.
दि. २० सप्टेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने वारक ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधून केशव धोंडू लोखंडे, उज्वला निशांत बेडखळे, मीना विक्रम सापळे हे सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित दोन प्रभाग व सरपंच पदाच्या व सरपंच पदासाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. त्यामध्ये ऍड वारेकर राष्ट्रवादी गटाकडून प्रभाग क्रं १ मध्ये रेश्मा नितेश गंभीर, मंगल रमेश कोळी ,एकनाथ रोंग्या गंभीर, तर प्रभाग क्रं २ मध्ये देखील ऍड वारेकर गटाकडून मनीषा विठ्ठल वाघमारे, गोपाळ दाजी जाधव व वेदिका विजय वारेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मतदारराजा बुचकळ्यात पडला आहे.
सरपंच पदाचे उमेदवार ऍड दिनेश वारेकर अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणगांव तालुका महिला आघाडी अध्यक्षा संगिता बक्कम तसेच माजी पं. स. सदस्य शैलेश बाबुराव भोनकर, कुणबी समाज नेते व राष्ट्रवादी नेते सहदेव बक्कम, ग्रामस्थ व महिला यांची मोटजी उपस्थिती होती. तर वैष्णव साठे यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करताना विठोबा दळवी, सचिन उभारे, योगेश बेंडखळे, अनंत साठे, अनंत विचारे, समस्त शिंदे परिवार, कृष्णा जाधव, अनंत धसाडे, विकेश सापळे व बहुतांश प्रतिष्ठित स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार यात तिळमात्र शंका नाही असे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.
सरपंच पदासाठी असणारे उमेदवार वैष्णव साठे हे युवा नेतृत्व म्हणून गावामध्ये अशी त्यांची ओळख आहे. तर ऍड दिनेश वारेकर यांची देखील एक सामाजिक नेतृत्व म्हणून ओळख आहे. वैष्णव साठे हे खासदार सुनिल तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत तर ऍड दिनेश वारेकर हे देखील खासदार सुनिल तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळे सरपंच कोण बनणार ?याकडे वारक ग्रामपंचायत हद्दीतील मतदारराजाचे लक्ष लागून राहिले आहे. ही लढत अशीच राहणार की खासदार तटकरे मध्यस्ती करून कुणाला तरी एक अर्ज मागे घ्यायला लावणार? असे देखील तर्क- वितर्कांना उधाण आले आहे. मात्र आता संधी आमची आहे आणि ती मिळवून घेणार अश्या पवित्र्यात असणारे सरपंच पदाचे उमेदवार वैष्णव साठे हे कुठल्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तर राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार ऍड दिनेश वारेकर म्हणाले की, आम्ही खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासकामे गेल्या ५ वर्षात केली आहेत. त्यामुळे जनता आमच्या बाजूनेच कौल देणार हे त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे आता माघार नाही अशी भूमिका देखील वारक ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे उमेदवार ऍड दिनेश वारेकर यांनी घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. हे सर्व काही असले तर ना... गट ना ..तट ना कोणतीही अट अश्या पद्धतीने वारक ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी रंगणार व कौन बनेगा सरपंच ?? वैष्णव साठे की दिनेश वारेकर? ही चर्चा संपूर्ण माणगांव तालुक्यात रंगली आहे.



0 टिप्पण्या