प्रतिनिधी - चिंचवड
राजु अशोक भास्कर रा.कुसुंबे बु।। ता.रावेर जि. जळगाव यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI)पदी राज्यात 102 क्रमांक मिळवून निवड झाली आहे तरी त्यांच्या कुसुंबे गावात व इतर शेजारील गावात आनंदाचे वातावरण आहे.अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्याचा वर्षाव होत आहे.
राजु अशोक भास्कर यांचा जन्म रा.कुसुंबे या एका खेडेगावात झाला लहानपणापासून गरिबीचे चटके सहन करीत त्यांनी मोठ्या जिकरीने अभ्यासाला सुरुवात केली वडील शेतमजुरी आणि शेळी पालन करीत होते तर मोठा भाऊ रोजनदारी ने काम करीत होते मोठ्या भावाने आणि वडिलांनी राजू भास्कर मधील गुणवत्ता चांगल्या प्रकारे ओळखली होती म्हणून त्यानी शेतमजुरी व शेळीपालन करून त्यांना शिकवले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गावातच झाले गावात शिक्षण घेत असताना ते तेथील शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते.उच्च माध्यमिक व कॉलेजात ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेले.अपयश हे त्यांच्या आयुष्यात जणू लिहिलेच नव्हते.परिस्थिती अत्यन्त गरिबीची असल्याने त्यांनी पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले व पोलीस म्हणून पुणे पोलीस दलात निवड झाली व त्यांनी प्रशिक्षण काळात प्रथम क्रमांक सुद्धा मिळवला.परंतु लहान पणापासूनच जिद्दी स्वभाव असल्याने ते तिथेच न थांबता त्यांनी मोठ्या अधिकारी पदावर कसे जाता येईल यासाठी सतत कष्ट करीत होते.पोलीस खात्यातील नोकरी सांभाळून mpsc चा रात्र दिवस अभ्यास करून अधिकारी पदी निवड कशी होईल यासाठी कठोर परिश्रम घेत होते.2016 ला घेण्यात आलेल्या mpsc psi एक्साम मध्ये त्यांनी अवघ्या 2 मार्कानी आपली पोस्ट गमावली होती.त्यांच्या आयुष्यात ते पहिल्यांदा अयशस्वी झाल्यामुळे त्यांना हे दुःख कायम मनात बोचत होते.पण ते तिथेच थांबले नाही सुदैवाने 2017 ला लगेच mpsc एक्साम ची जाहिरात निघाली आता मात्र त्यांनी ठाम निश्चिय केला की आता काही केल्या या परीक्षेत आपण यश मिळवल्या शिवाय राहायचे नाही म्हणून त्यांनी पोलीस दलातील नोकरी सांभाळून 18,18 तास अभ्यास सुरू केला सरते शेवटी तो दिवस उजाडला आणि निकाल लागला या परीक्षेत 322 पदामध्ये राज्यात 102 रँक मिळवत घवघवीत यश मिळवले.आपल्या मुलाचे कष्ट बघून आई वडील,भाऊ बहीण इतर नातेवाईकांचे आनंदाश्रू अनावर झाले .समस्त कुसुंबे ग्रामस्तानी व शिक्षकानी गावातील शाळेमधील पहिला Psi झाला म्हणून जाहीर सत्कार केला व तोंडभरून कौतुक केले.तसेच चिंचवड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालयात तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.


1 टिप्पण्या
Congratulations once again.dear Raju..he is my friend. Proud of you 🎉
उत्तर द्याहटवा