मी आजच कर्ज घेऊन माझे थकीत घरगुती वीज बिल भरणार - प्रवीण अवचर (मांगी)

 


प्रतिनिधी - करमाळा

प्रतिनिधी - करमाळा


 अविरात्र जनतेला वीजपुरवठा  करणारे महावितरण कर्मचारी आज प्रचंड आर्थिक संकटात असून वेळेवर वसुली न झाल्याने  

कर्मचाऱ्यांच्या पगारी कोठून द्याचा हा गंभिर प्रश्न वीज मंडळाकडे निर्माण झालाय ,आज नवीन भरती झालेले कित्येक कंत्राटी कामगार विना पगार काम करत आहेत, त्यांना आपले कुटुंब कसे जगवायचे याची चिंता सतावते आहे ,जीव जोखमीत घालून विजेची कामे करावी लागतात ,लॉकडाऊन काळात कोरोना सारख्या भयानक संकटात पण जिवाची पर्वा न करता अखंड वीजपुरवठा केला, 

अनेक कर्मचारी सेवा देताना मृत्य हि झाला ,सुरळीत वीज पूरवठा करताना खूप जोखीम घ्यावी लागते ,कोरोना काळात लोक घरात बसून होती त्यामुळे वीज  ग्राहकांकडून ,मोबाईल tv ,फ्रीज, दिवे ,एसी ,पंखे व 

घरगुती विजेवर ची साधन यांचा अतिवापर झाला  ,अशातच चोरून  वीज वापरणारे ,खांबावरील आकडे यांना पण अभय भेटले ,

हॉस्पिटल ला 24 तास अखंड वीज पुरवली त्यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले ,अनेक कंपन्यांची वर्क टू होम कामे सुरू होती केवळ अखंडित वीज पूरवठयामुळे च हे शक्य झाले ,

ग्राहकांनी  9 ते 10 महिने झाले कोरोना काळातील वीज बिले  आजपर्यंत थकीत ठेवली आहेत ,त्यामुळे महावितरण कडे मोठ्या प्रमाणात  आर्थिक कमतरता भासत आहे ,नुकतेच ऊर्जामंत्री  नितीन जी राऊत साहेब यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केलय त्यामुळे नक्कीच 

वीज कर्मचाऱ्यांना यातून फायदा होईल ,आणी वीज मंडळांनी पण ग्राहकांना बिल भरण्यात सवलत द्यावी टप्प्या टप्प्याने बिल भरण्यास सवलत दयावी  डायरेक्ट वीज तोडायची कार्यवाही स्थगित करावी, कारण कोरोना संकटामुळे ग्राहकांचे पण आर्थिक चक्र पूर्ण थांबले आहे ,त्यामुळेच नियमित वीज भरणारे ग्राहकांचे पण नाईलाजाने वीज बिल थकले आहे ,

तसेच शेतकरी बंधूना पण वीज बिलात ,सवलत देऊन त्यांना योग्य न्याय दयावा आणि मी अपेक्षा करतो आपण हि सर्वांनि 

वेळेत टप्प्या टप्प्या ने का होईना थकीत  वीज बिल भरावे व  आपलेच बांधव वीज कर्मचारी यांची आर्थिक संकटातून सुटका करावी 🙏


           मनुष्याला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न ,वस्त्र ,निवारा याप्रमाणेच दैनंदिन जीवनात वीज पन महत्वाचा घटक बनली आहे ,

आजकाल  सर्वच जीवनावश्यक वस्तू विजेशिवाय चालूच शकत नाहीत ,शेती,कारखाने ,उद्योग व्यवसाय ,रेल्वे ,असो सर्वच मूलभूत गरजा या विजेशिवाय पूर्ण होतच नाहीत ,अशातच पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत, यामुळे  सध्या सरकार याला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक ई कर ,इ बस  ई बाईक च उतत्पन्न अंतिम टप्प्यात आहे ,यामुळे अधिकच ताण हा महावितरण वरती येणार आहे ,तरी माझी आंदोलन कर्त्यांना विनंती आहे ,आपण वीज दारवाढी बाबत आंदोलन करता हे मान्य आहे जरूर वाढीव वीज दराने शेतकऱ्यांसह आपण सर्वच त्रस्त आहोत ,आंदोलन करायचा अधिकार सर्वाना आहे मात्र जर आंदोलन करायच तर सरकार विरोधात व त्यांचे धोरणाविरोधात करा ,वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करून किंवा वीज कार्यलय फोडून टाळे लावून प्रश्न सुटणार नाहीत ,ते पण आपल्यासारखे चाकरमानी आहेत ,जो आदेश सरकार देईल तोच ते पाळणार आपण मात्र असे करतोय" गुन्हा करतोय बंगलेवाला" 

व आपण शिक्षा करतोय वाचमेनं ला बिचारा त्याचा काय दोष यामध्ये ,तसे काही वीज कर्मचार्यांचे बाबतीत आपण करतो आहोत दोष हा सरकारचा आहे हे आपयश सरकारच आहे ,सवलती देणे ,वीज बिल माफ करणे पण आपण राग मात्र स्थानिक वीज कर्मचारी याना मारहाण करुंन किंवा वीज कार्यलय तोडून आपलीच नुकसान करुंन घेतोय ,याकरिता आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत ,

तरी सध्या निम्मे किंवा टप्प्या टप्प्या ने  वीज बिल भरून 

वीज महामंडळाला सहकार्य करा 

प्रवीण अवचर (मांगी) 

9096166403

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या