नाशिक - प्रांत पोलीस मित्र संघाच्या कार्याचे नाशिक परिक्षेत्र विस्तारीकरण व सक्रीयते साठी विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP)मा.प्रतापराव दिघावकर साहेब यांनी केले मनापासून कौतुक

 


प्रतिनिधी - नाशिक


 प्रांत पोलीस मित्र संघाच्या नाशिक परिक्षेत्रातील विस्तारीकरणासाठी तसेच विभागातील पाच जिल्हे यामधील संघटना सक्रिय   करण्याच्या कार्याला तसेच संपुर्ण कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रांत पोलीस मित्र संघाचे सर्व सभासद कार्यकर्ते व पदाधिकारी पोलीस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करतील तसेच वेळोवेळी पोलिसांच्या समस्या जाणून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य यांसारखे असे अनेक विधायक कार्य प्रांत पोलीस मित्र संघाच्या वतीने मागील अनेक वर्ष सातत्याने राबवण्यात आलेले आहेत त्याबद्दल मा. प्रतापराव दिघावकर साहेब IGP यांनी मनापासून कौतुक केले.

 करोना सारख्या महाभयंकर महामारी,नाशिक मधील कुंभ मेळ्यासारख्या अत्यंत गर्दीच्या वेळी येणारा पोलीस बांधवांवरिल अतिरिक्त ताण थोड्याफार प्रमाणामध्ये प्रांत पोलीस मित्र संघ जाणून त्यांच्यासोबत सक्रिय पोलीस मित्र किंवा विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्य करण्यास सक्षम आहे असे दिघावकर साहेबांच्या निदर्शनास आणून दिले

 त्यावेळी मा. दिघावकर साहेबांनी प्रांत पोलीस मित्र संघ उशिरा नाशिक विभागात पोहोचत असल्याची माहित दिली.

 मा.विशेष पोलीस महानिरीक्षक मा.प्रतापराव दिघावकर साहेब यांच्या भेटीचे औचित्य साधत नाशिक विभागामधील नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी मा.डॉ.समाधान पवार व नाशिक शहर संघटक पदी मा. महेशजी बिरारी यांची निवड करण्यात आली.

 प्रांत पोलीस मित्र संघाचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात सक्रियपणे प्रचार व प्रसार करीत पोलीस बांधवांना तसेच समाजातील नागरिक बंधूंना अत्यंत सामाजिक भावनेने महत्त्वपूर्ण मदत होत असते.


 वरील कार्यक्रमाच्या वेळी मा.श्री.दिघावकर साहेब बोलत होते प्रांत पोलीस मित्र संघाचे सर्व जिल्हा तालुका कार्यकारीणी याद्या जवळच्या पोलिस स्टेशनला कळवून वेळोवेळी पोलिसांच्या वरील अतिरिक्त ताण येत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच आपल्या सभासदांना नेमून दिलेल्या परिसरात सक्रिय व्हावे त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मी मदतीस तयार आहे.

 वरील कार्यक्रमांमध्ये प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी यांनी मा.दिघावकर साहेब यांचा सत्कार करीत साहेबांच्या परीक्षेत्रांमध्ये असलेल्या उत्कृष्ट कार्यपद्धती  बद्दल तसेच शेतकऱ्यांच्या पाठीमागे एक जाणता राजा च्या रूपात अत्यंत प्रभावीपणे उभे  असलेले साहेब यांचे कौतुक केले कारण नाशिक परिक्षेत्रात आपली विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर जवळपास बावीस कोटींची शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून असलेली थकबाकी आपण अत्यंत अल्पावधीत शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा मिळवून दिला त्यामुळे संपूर्ण नाशिक व इतर जवळपासच्या जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.  असे प्रशासकीय अधिकारी लाभने म्हणजे नक्कीच नाशिक विभागातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत खुशीची बाब आहे.

 वरील कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.प्रकाशजी खैरनार नाशिक शहर डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ.राजेंद्रजी भामरे नवनिर्वाचित नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ समाधान पवार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले उत्कृष्ट क्रीडापटू मा.महेशजी बिरारी मयूर केदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या