पिंपरी पुणे :- प्रतिनिधी, बाळासाहेब सूळ
दि.२ सप्टेंबर २०२० बुधवार रोजी पोलीस प्रवाह न्यूज व अखिल युवा पत्रकार संघ वाकड तर्फे कोरोना काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी अहोरात्र कर्तव्य पार पाडत असेलेल्या वाकड पोलीस स्टेशन येथील डॉक्टर विवेक मुगळीकर सीनिअर पीआय व पोलीस कर्मचारी यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन अखिल युवा पत्रकार संघचे पदाधिकारी श्री बाळासाहेब सुळ अध्यक्ष वाकड विभाग, सचिव श्री आत्माराम काळे ,कार्य अध्यक्ष ज्ञानेश्वर तावरे,यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले .
त्यात खालील पोलीस *अधिकारी/कर्मचारी* यांचा समावेश आहे.
1) एपीआय श्री हरीश माने व एपीआय श्री तानाजी भोगम व इतर पोलिस कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
कोविड १९ विरोधात लढा देण्याचे आव्हानात्मक कार्य या कोरोणा योद्धा नी केले या कठीण काळात पोलिस लोकांनी दाखविलेला उत्साह अतुलनीय आहे.
या साठी देशातील सर्व नागरिकांनी नक्कीच त्यांना कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे.
पोलिस प्रवाह न्यूज वअखिल युवा पत्रकार संघ वाकड विभाग तर्फे राष्ट्रासाठी निस्वार्थ योगदान देणाऱ्या या शूरवीर कोरोना योद्धा ना मानाचा सलाम व त्यांचे हार्दिक अभिनंदन..



1 टिप्पण्या
Good job fron cops
उत्तर द्याहटवा