*पुणे पिंपरी :- श्री बाळासाहेब सुळ वाकड ( विभाग अध्यक्ष )*
वाकड येथे आज साध्या पद्धतीने आणि करोनाचे नियमांचे पालन करून घरगुती गणेश विसर्जन करण्यात आले. अनेक घरगुती गणपतीचे महानगर पालिकेने तयार केलेल्या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मूर्ती दान करण्यात आल्या. वाकड परिसरात याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
वाकड परिसरात काही ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी येथील नगरसेवकांनी आप आपल्या वॉर्ड गणपती विसर्जन साठी खास व्यवस्था बनविण्यात आली होती. या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, रस्त्याच्या मार्गावरील साफसफाई, निर्माल्य कलश, कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली होती.
तर काही ठिकाणी कुत्रिम तलाव गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आले होते. मुर्ती दान करायच्या आहेत, त्यासाठी स्वतंत्र ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी महानगर पालिकेचे कर्मचारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वाकड विभागात ,काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, थेरगाव, डांगे चौक, पिंपळे निळख या परिसरात ठीक-ठिकाणी गणपती विसर्जन हौद तयार करण्यात आले होते तर त्यासोबत निर्माल्य गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती गणपतीचे सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जनास सुरुवात झाली . दिवसभरात जवळपास ६ ते ७ हजार गणपतींचे विसर्जन साध्या पद्धतीने करण्यात आले. विसर्जनानंतर मूर्ती दान करण्यात आल्या.
यावर्षी करोना विषाणू संसर्गामुळे नागरिकांनी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिला. पारंपरिक वाद्ये यावेळी वाजविण्यात आली नाहीत. सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांची नागरिकांनी अंमलबजावणी केली.
*सोसायट्यांमध्ये सामाजिक अंतर पाळून विसर्जन* :
वाकड, पिंपळे सौदागर,रहाटणी, थेरगाव,काळेवाडी, डांगे चौक येथील काही सोसायट्यांत पार्किंगमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करत असताना सामाजिक अंतर पाळत मास्क लावून व कोरोना विषयक सर्व खबरदारी घेऊन मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर अनेकांनी महापालिकेच्या फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन केले.
या वेळी अखिल युवा पत्रकार संघाचे वाकड विभागाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सुळ, सचिव श्री आत्माराम काळे, कार्यअध्यक्ष श्री ज्ञानेश्वर तावरे यांनी पोलिस व महानगर पालिका प्रशासनाला उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी मदत केली.



0 टिप्पण्या