श्री दत्तात्रय महाराजांच्या जत्रोत्सव उत्साहात साजरा
पोलिस प्रवाह न्युज
माणगाव - दि. २२- माणगाव तालुक्यातील मानाची समजली जाणारी लोणेरे-गोरेगांव मार्गावरील चिंचवली येथील श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्टच्यावतीने शनिवार दि. २१ एप्रिल रोजी आयोजित केलेला श्री दत्तात्रय महाराजांचा (बुवा) जत्रोत्सव मोठ्या उत्साहात झाला.
सोमवार सायंकाळी भाविक भक्तांनी जत्रोत्सवात मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. प्रसंगी - रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेल्या हजारो भाविक भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावून श्री दत्तात्रय महाराजांच्या मुर्तीचे व पालख्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. जत्रोत्सवास सायंकाळी ६ वा. जोरदार सुरुवात झाली होती. पहाटे ५ वाजेपर्यंत हा जत्रोत्सव मोठ्या गर्दीत सुरू होता. दरम्यान स. पो. नि. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरता चोख बंदोबस्त ठेवल्याने जत्रोत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
प्रतिवर्षाप्रमाणे लोणेरे, गोरेगांव व आजूबाजूच्या गावांमध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने संघटनेच्यावतीने लोणेरे-गोरेगांव मार्गावरील चिंचवली येथील श्री दत्तात्रय देवस्थान ट्रस्टच्यावतीने शनिवार दि. २१ एप्रिल रोजी आयोजित केलेला. श्री दत्तात्रय महाराजांचा (बुवा) जत्रोत्सव मोठ्या उत्साहात झाला. यावेळी श्री दत्तात्रेयांची आरती करताना भाविकजत्रोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी श्री दत्तात्रयाची पालखी वाजत गाजत गोरेगांवचे जागृत देवस्थान श्री भैरवनाथ महाराजांना ८ निमंत्रण देण्यासाठी गेली होती. दरम्यान श्री दत्तात्रय महाराजांची पालखी सोबत व श्री भैरवनाथ महाराजांचीं पालखी श्री दत्त मंदिरात परतताच पुजाअर्चा, आरती होऊन जत्रोत्सव सुरवात झाली.
माणगांव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वधर्मीयभाविक भक्तांनी मंदिरातील मुर्तीचे, पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. लोणेरे - गोरेगांव मार्गावरील चिंचवली फाटा ते गोरेगांवच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या परिसरात खेळण्यांची,खाद्यपदार्थ, मिठाईचीं, पाळणे, व घरगुती उपयक्त अनेक प्रकारच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. अनेक नागरिकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केल्याचे दृश्य पहायला मिळाले. जत्रोत्सव सर्वधर्मीय समभावाचे प्रतिक मानले जात असल्याने यावर्षी गर्दीने उच्चांक मोडल्याचे दिसले. पहाटे ५ वाजेपर्यंत जत्रोत्सव सुरू होता. प्रसंगी एपी आय सुर्वे , पि.एस.आय.रासकर, ए.एस.आय.माने, हेड कॉन्स्टेबल पाडूरंग सानप, बेंदूगडे, यशवंत चव्हाण, घोडके, पोलीस हवालदार पेलणेकर, गुडेकर, महिला पोलिस खाडे, ट्रॅफिक पी. आय.महाडीक, दळवी व गोरेगाव पोलिस ठाण्यात कर्मचारी तसेच होमगार्ड यांच्यासह सुमारे ५० पोलिस कर्मचाऱ्यांनी सतत फिरता बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
रात्रीच्या सुमारास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मान्यवर यांनी श्री दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली होती.
जत्रोत्सव यथासांग पार पडावा म्हणून ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश टेंबे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष अरुण चालके, उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश केसरकर, दक्षता कमिटीच्या अध्यक्ष सुधाकर करकरे, उपाध्यक्ष नथुरामतात्या करकरे, सचिव पंढरी शेडगे, खजिनदार मधुकर नाडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, सिताराम उभारे , रवि टेंबे, अभिजित टेंबे, रमेश मोरे, माजी सरपंच वामन बैकर, संतोष भात्रे, पांडूरंग वाघोस्कर, अशोक शिंदे, परेश अंधेरे, सुजित भोजने, चंद्रकांत भोजने, देवळी सरपंच विनेश डवले, गजानन भोईर, सत्वे, अविनाश उतेकर, नथुराम अंधेरे, अरुण तोंडलेकर, केशव जांबरे, वसंत अंधेरे, वारिक बुवा तसेच विभागातील सर्व ग्रामपंचायती चे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व पदाधिकारी कुणबी समाज बत्तीशीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवळी चे सर्व ट्रस्टीचे सभासद तसेच एकता मंचाचे शिलेदार यांनी मेहनत घेतली.





0 टिप्पण्या