माणगाव पोलीस ठाण्याला आयएसओ A++ स्मार्ट पोलीस पुरस्कार प्राप्त
पोलिस प्रवाह न्युज
माणगाव - दि. २०- रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याला नामांकित आयएसओ स्मार्ट A++ पोलीस ठाणे पुरस्कार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते दि. १९ एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. माणगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी हा पुरस्कार अलिबाग येथे स्वीकारला.
माणगाव तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगाव पोलीस नेहमी सज्ज असतात. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस अहोरात्र २४ तास आपली सेवा बजावीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांचा जनसंपर्क वाढला असून जनतेसोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. स्मार्ट पोलिसिंग, संवेदनशील, आधुनिक, सतर्क, जबाबदार, विश्वसनीय, सशक्त पोलीस फौज, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम इ. मुद्द्यांवरती हा पुरस्कार माणगाव पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाणे सुसज्ज करण्यात आले आहे. तक्रारदारांना बसण्यासाठी आसन, सुसज्ज इमारत, पाणपोई सध्या अनेक सुख सुविधा माणगाव पोलीस ठाणे येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. माणगाव पोलीस ठाणे कडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात माणगाव पोलिसांना यश लाभले आहे. माणगाव तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगाव पोलीस अहोरात्र झटत असतात. हा पुरस्कार मिळाल्याने पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व माणगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



0 टिप्पण्या