कोस्ते सी. एन. जी. पेट्रोल पंपासमोर मोटारसायकल व वॅगनर कारचा अपघात
सुदैवाने जीवितहानी टळली.
पोलिस प्रवाह न्युज
माणगाव- दि. २७- माणगांव शहरातून पुणे दिघी महामार्ग जातो. माणगाव निजामपूर मार्गे पुणे असा मार्ग असून हा दुर्लक्षित राहिला आहे. अरुंद रस्ता आणि सतत वाहनांची रेलचेल यामुळे या महामार्गावर सतत अपघात होत आहेत. यामध्ये अनेक अपघातग्रस्तांना आपले अवयव तर काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत. असाच एक अपघात माणगांव दिघी पुणे महामार्गावर असणाऱ्या कोस्ते खुर्द येथील सी. एन. जी. पेट्रोल पंपासमोर दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, घटनेतील फिर्यादी सौरभ सदानंद महाडीक रा. पाणोसे ता. माणगांव हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल होंडा शाईन क्रमांक एम एच ०६ बी वाय १०६५ यावर त्याचा मित्र रोशन राकेश शिर्के दोघेही रा. पाणोसे ह्यांना माणगाव बाजुकडून निजामपूर मार्गे पुणे कडे जाणारी वॅगनार कार क्रमांक एम एच १२ यु जे ३४०४ यातील आरोपीत राहुल ज्ञानेश्वर रेणुसे रा. सिंहगड आंबेगाव पठार पुणे यांनी आपल्या ताब्यातील कार हयगईने, अतिवेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तक्रारदार महाडिक यांच्या मोटारसायकलला अपघात केला. यामध्ये तक्रारदार महाडिक महाडीक व त्यांच्यासमवेत असणारे त्यांचे मित्र रोशन शिर्के यांना छोट्या मोठया दुखापती झाल्या व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ८४/२०२५ भा. न्या. स. क. १२५(अ), १२५(ब), २८१ मो. वा. का. क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. किरण तुणतुणे करीत आहेत.




0 टिप्पण्या