माणगांवमध्ये शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाकडून विविध सामाजिक उपक्रम.

 माणगांवमध्ये शिवजयंती निमित्त सकल मराठा समाजाकडून विविध सामाजिक उपक्रम.


पोलिस प्रवाह न्युज

 माणगाव - दि.- २१- सकल मराठा समाज तालुका माणगावच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव २०२५ साजरा करण्यात आला. त्यामध्ये शिवज्योत यात्रा संपन्न झाली. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथून क्षत्रिय मराठा भवन, माणगाव येथे युवा मावळ्यांच्या माध्यमातून जल्लोषमय वातावरणात शिवज्योत आणण्यात आली. सदर शिवज्योत यात्रेमध्ये प्रांताधिकारीसं दिपान सानप, तहसीलदार दशरथ काळे, माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, माणगाव मा. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, न.पं मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक कपिल गायकवाड, व्यापारी अध्यक्ष लक्ष्मण दळवी, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष संजय (आण्णा) साबळे, मा. नगराध्यक्ष आनंद यादव, श्रीरामनवमी उत्सव समिती अध्यक्ष शेखर गोडबोले, मा. उपनगराध्यक्ष सचिन बोंबले या मान्यवरांच्या हस्ते शिवज्योत यात्रेचे पूजन करण्यात आले.


क्षत्रिय मराठा भवन येथे शिवज्योत यात्रेचे आगमन झाल्यानंतर जयवर्धन मोरे  यांच्या दाम्पत्य हस्ते शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवर तहसिलदार दशरथ काळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे तसेच मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर, निजामपूर माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे, क्षत्रिय मराठा अध्यक्ष राजू मोरे, मराठा कर्मचारी मित्र मंडळ अध्यक्ष प्रा.डी.एम.जाधव, मराठा कर्मचारी शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रमोद देशमुख, क्षत्रिय मराठा माजी अध्यक्ष शंकर पवार, सुभेदार जयलेश नलावडे, रमेश ढेबे यांच्या हस्ते "जिजाऊंची लेक विशेष सन्मान पुरस्कार" विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना देण्यात आला.


 सन्मान पुरस्कार देण्यात आलेल्या सत्कारमूर्ती माणगाव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, मा. नगराध्यक्षा योगिता चव्हाण, मा. नगरसेविका भाग्यश्री यादव, डॉ.दिप्ती घाग, डॉ.केतकी क्षीरसागर, डॉ.पूर्वा सावंत, ॲड.दिप्ती मोरे, मुख्याध्यापिका संपदा महाळुंगे, मुख्याध्यापिका पूजा गायकवाड, ॲड. सायली दळवी, ॲड.सेजल घाग, सरपंच प्रणाली भागडे, मा. सरपंच संचिता मोरे, मा. सरपंच राजेश्री पोळ, मा. सरपंच सुजाता कदम, मा. सरपंच राजेश्री कदम, मा. सरपंच वैशाली डांगरे, पत्रकार स्वप्ना साळुंखे, विशेष उल्लेखनीय कामगिरी आराध्या माने, शालिनी सावंत, महिला उद्योजिका सोनाली चव्हाण, अश्विनी मालुसरे, मेघना शेडगे यांचा सन्मान करण्यात आला.

महिलांचे हळदीकुंकू समारंभ पार पडला. दुपारी भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरज कडू, महेंद्र कनोजे, अनिल चव्हाण, अमोल माने, नितीन शेलार, मिलिंद शेलार, संजोग मानकर, लोहित दळवी, स्वप्निल वाघ, आनंद थोरात, संतोष रणपिसे सर, शंकर पवार, संजय घाग, अरुण क्षीरसागर, प्रमोद देशमुख, अजय इंगळे, अमोल पवार, तेजस पवार तसेच सकल मराठा समाज महिला वर्गाने प्रचंड मेहनत घेतली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या