शिवजयंती निमित्त माणगांवमध्ये शिवगर्जना कार्यक्रम.
माणगाव - दि.- २०- मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविणारी संघटना मराठा कर्मचारी मित्रमंडळ कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहोळा मोठया उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येतो. २०२५ हे वर्ष या संघटनेचे १९ वे वर्ष आहे. यावर्षीही मराठा कर्मचारी मंडळाकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी शिवभक्तांसाठी अशोकदादा साबळे विद्यालयाच्या रंगमंचावर सुप्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे यांचा अस्सल मराठी शिवगर्जना कार्यक्रम पार पडला. यामध्ये शिवभक्ती गीते, पोवाडा व शिवव्याख्यान असे कार्यक्रम होते तर सोबत सुरेल संगीत देखील होते. या कार्यक्रमाचा हजारो माणगांवकर शिवभक्त नागरिकांनी उपस्थिती दाखवून लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातील शिवप्रतिमा पूजनानंतर माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांना मराठा कर्मचारी मित्रमंडळ यांच्याकडून "शिवभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. याच व्यासपीठावर महिला बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे, माणगांव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, न. प. मुख्याधिकारी संतोष माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, आनंद यादव, योगिता चव्हाण, नगरसेवक कपिल गायकवाड, न. प.सभापती नंदिनी बामुगडे, सुशीला वाढवळ, शिवसेना तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, गजानन अधिकारी, मोर्बा उपसरपंच राजू मोरे, व्यापारी संघटना अध्यक्ष लक्ष्मण (बाळा)दळवी आदी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मराठा कर्मचारी मित्रमंडळ यांच्याकडुन माणगांव शहरात मध्यवर्ती ठिकाणी दर्शनी भागात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी या मागणीला दुजोरा देत माणगांवमध्ये लवकरच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असे अश्वासित केले. तर ना. आदिती तटकरे यांनी देखील मराठा कर्मचारी मित्रमंडळाला आश्वासन दिले की, मंडळाची पुढच्या वर्षी २० वी शिवजयंती साजरी होत असताना माणगांव मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरु झालेले आपणांस पहावयास मिळेल असे सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार भरत यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या.
कार्यक्रमाच्या नियोजन आणि व्यवस्थापनात मराठा कर्मचारी मित्रमंडळ कार्यकारिणी अध्यक्ष प्रा.धनाजी जाधव (सर) ,कार्याध्यक्ष भानुदास बिरादार, उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, लक्ष्मण वालगुडे, सचिव अंबादास चितळे, सहसचिव ईश्वर पाटील, खजिनदार संभाजी भोसले, संघटक राकेश सावंत, कार्यालय प्रमुख अजय रेणोसे व मंडळाचे सर्व सदस्य तसेच शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष अध्यक्ष प्रमोद देशमुख, उपाध्यक्ष महादेव बावचकर, आनंद थोरात, कार्याध्यक्ष सोपान बर्गे, सचिव नागनाथ सुर्वे, सहसचिव सुनिलदत्त चव्हाण, खजिनदार विश्वास मरवडे, संघटक प्रा.नितीन पाटील व समितीचे सर्व सदस्य यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.धनाजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन तुषार बागडे यांनी केले. आभार प्रदर्शन भानुदास बिरादार (सर) यांनी केले. समस्त मराठा कर्मचारी मित्रमंडळ, सभासद, शिवजयंती उत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या सहकार्याने शिवगर्जना कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



0 टिप्पण्या