छत्रपती शासन अर्जुन फाउंडेशनची शिवप्रतिमा शोभायात्रा संपन्न.
माणगाव - दि. - २२- संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार शिवजयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी माणगांवमध्ये छत्रपती शासन व अर्जुन फाउंडेशन व शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. माणगांव तालुक्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी युवकांची संस्था "छत्रपती शासन" अर्जुन फाउंडेशन या संस्थेकडून व शिवजयंती उत्सव समिती माणगांव यांच्याकडून दरवर्षी शिवजयंती सोहळा उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येतो. हे वर्ष या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते.
त्याचप्रमाणे या २०२५ वर्षी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवप्रतिमा शोभा यात्रा बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता माणगांव स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोर्बा रोड ते मुंबई गोवा हायवेवरुन बालाजी मंदिर माणगांव अशी काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध बालकलाकारांनी शिवकालीन सांस्कृतिक वेशभूषा केली होती. तसेच या सोहळ्यादरम्यान अनेक सामजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शासन, अर्जुन फाउंडेशन ही संस्था सामजिक कार्यात नेहमीच सहभागी असेल व अनेक समविचारी संघटनाना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे, असे मत संस्थेचे संस्थापक डॉ अमेय (परेश) उभारे यांनी व्यक्त केले आहे. शिवप्रतिमा शोभा यात्रा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात छत्रपती शासन, अर्जुन फाउंडेशन, शिवजयंती उत्सव समिती माणगाव च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.



0 टिप्पण्या