उमरोली येथे शिवजयंती उत्सव साजरा
पोलीस प्रवाह न्यूज
अखंड हिंदुस्थानचे युगपुरूष छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव माणगांव तालुक्यातील उमरोली तर्फे खरवली येथे धुमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला सकाळी ६.३० वा. किल्ले रायगडवरून ज्योत वाजतगाजत मौजे उमरोली गावात आणण्यात आली. मोठ्या उत्साहात उमरोलीकरांनी शिवज्योतचे स्वागत केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ उमरोलीकडून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी हे ५ वे वर्ष असून सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी महाप्रसाद झाल्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला 'छावा' चित्रपट प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




0 टिप्पण्या