माणगांवमध्ये महाआरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद.
पोलिस प्रवाह न्युज
माणगाव - दि. १६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माणगावमध्ये ना. भरत गोगावले युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ फेब्रुवारी रोजी शिपुरकर वाघरे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाआरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक निलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चाळके, शिवसेना तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, माणगांव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, स्वी .नगरसेवक सुनिल पवार, उपशहरप्रमुख ॲड. प्रसाद धारिया, खरवली सरपंच संतोष खडतर, युवासेना तालुका प्रमुख राजेश कदम व शिवसेना युवासेना विविध आघाडी व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे महाआरोग्य शिबीर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांची ई सी जी, हृदयरोग, नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, जनरल तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, हाडांचे विकार, स्त्री-रोग व बालरोग, आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व मोफत औषध वाटप करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराचा माणगांव तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला व मोफत आरोग्य तपासणी व उपचार घेतले. माणगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवासैनिक तसेच शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि डॉक्टर यांनी सुसूत्रीतपणे कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन केले.



0 टिप्पण्या