संतोष म्हात्रे यांची इंडिया फ्रीस्टाइल किकबॉक्सिंग ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड
पोलिस प्रवाह न्युज
पिंपरी - दि.- १७ - भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाच्या पदांपैकी एक असलेल्या इंडिया फ्रीस्टाइल किकबॉक्सिंग ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी संतोष म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः पिंपरी-चिंचवडमधील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
संतोष म्हात्रे यांनी गेल्या 17 वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर किकबॉक्सिंग खेळाडू घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, "भारतातील फ्रीस्टाइल किकबॉक्सिंगच्या विकासासाठी मी पूर्णपणे समर्पित राहीन आणि खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य करत राहीन." त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, ही नियुक्ती भारतीय किकबॉक्सिंगच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




0 टिप्पण्या