लोणेरे गोरेगाव रिक्षा चालक मालक कल्याणकारी संघटनेतर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

 लोणेरे गोरेगाव रिक्षा चालक मालक कल्याणकारी संघटनेतर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन 


पोलिस प्रवाह न्युज

माणगाव - दि. - लोणेरे गोरेगाव रिक्षा चालक मालक कल्याणकारी  संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. १३ फेब्रुवारी रोजी लोणेरे रिक्षा स्टँड येथे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन अध्यक्ष  मुकुंद टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. हे या संघटनेचे २१ वे वर्ष आहे. या संघटनेतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

 यावेळी सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेण्यासाठी लोणेरे गोरेगाव विभागातील भाविकांची गर्दी केली होती. तसेच रिक्षा चालक मालक कल्याणकारी संघटना संस्थापक संजय आण्णा साबळे तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहुन दर्शन घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे  मार्गदर्शक शिवाजी टेंबे, माणगाव तालुका उपाध्यक्ष हारिदास शिंदे, उपाध्यक्ष अर्जुन ढेपे, कार्याध्यक्ष किशोर बैकर, सचिव प्रकाश शिगवण, खजिनदार संतोष शिर्के, उप खजिनदार श्रीतेज टेंबे, उपसचिव अजय नवाळे, सल्लागार गणेश वाघमारे, सल्लागार दिनेश अंबेकर, सल्लागार किसन चव्हाण, सल्लागार राजू टेंबे, सदस्य नारायण केसरकर, सदस्य राकेश टेंबे, सदस्य बाळा सत्वे,  राजा राळे व सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पूजेनिम्मित  भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी व विभागातील भाविकांनी यावेळी तीर्थ प्रसादाचा अन्न प्रसादाच लाभ घेतला. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सर्व रिक्षा चालक मालक कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या