माणगांव एम एम आर एफ सी क्रिकेट स्पर्धेत प्रतिक पाटील इलेव्हन संघ ठरला विजयाचा मानकरी



पोलिस प्रवाह न्युज

 माणगाव - दि. १०- रायगड जिल्ह्यात माणगांव मेडिकल रिप्रेझेंटेव्ह फ्रेंड सर्कल नावाची वैदयकीय प्रतिनिधी यांची संघटना अस्तिवात आहे. डॉक्टर कॉल आणि कंपनी प्रेशर यांपासून विरंजन म्हणून माणगांव मेडिकल रिप्रेझेंटटेव्ह संघटनेकडून दरवर्षी फार्मा फॅमिली गेट टुगेदर आयोजित करण्यात येतो त्याचप्रमाणे यावर्षी २०२५ या वर्षी एम एम आर एफ सी आणि माणगाव मेडिकोज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहमेळावा क्रिकेट स्पर्धेत प्रतिक पाटील इलेव्हन हा संघ प्रथम क्रमांक विजयाचा मानकरी ठरला आहे.

  या स्पर्धेत माणगांव महाड तालुक्यातील माणगांव मेडिकोजचे सर्व डॉक्टर पदाधिकारी व सदस्य केमिस्ट आणि डिस्ट्रिब्युटर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य, पॅथॉलॉजी संघटना सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात माणगांव एम एम आर एफ सी फाउंडर सदस्य कै. राजीव विजयशंकर वर्मा तसेच सभासद कै. भावेश शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    या सामन्यामध्ये माणगांव फार्मा फॅमिलीचे  एकूण १० संघ सहभागी झाले होते. तर एकूण १६० वैद्यकीय प्रतिनिधी (एम आर) हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच माणगांव मेडिकोजचे डॉक्टर एम एस निकम, डॉ. गौतम राऊथ, डॉ अजय मेहता, डॉ हेमंत गांधी, डॉ हसन, डॉ निजाम चौगुले, डॉ नितीश सावंत यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. या  स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिक पाटील इलेव्हन संघ, द्वितीय क्रमांक सनी घुलघुले इलेव्हन संघ तर तृतीय क्रमांक सागर पाशीलकर इलेव्हन संघ यांनी पटकावला.  मालिकावीर प्रथमेश भेसल,उत्कृष्ट फलंदाज रोहन पालकर, उत्कृष्ट गोलंदाज मारुती माऊले यांनी पारितोषिके पटकावली.

     माणगांव तालुका वैद्यकीय प्रतिनिधी संघटना (एम एम आर एफ  सी) ने दि. ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला स्नेहमेळावा अतिशय आनंददायी वातावरणात साजरा झाला. ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन जेष्ठ मार्गदर्शक अशोक तेटगुरे, अमित चव्हाण, वैष्णव साठे, शिरीष चव्हाण, सोपान आंबेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम आर एफ सी च्या प्रत्येक सदस्यांने पार पाडले. सर्व सामन्यांचे सूत्र संचालन व समालोचन महेश लहाने व मनिष मांदाडकर यांनी केले.