अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन

अण्णासाहेब वाघिरे  महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन


पोलीस प्रवाह न्युज

पुणे - दि. १०- ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे  महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पारितोषिक विजेते  अरुण डुंबरे -  मुख्य उपायुक्त गुप्तवार्ता विभाग मुंबई, कविता राऊत -सावरपाडा एक्सप्रेस - अर्जुन पुरस्कार विजेते व प्रणित पारधी ए.पी.आय. कांदिवली पोलीस स्टेशन मुंबई व प्रा. महेंद्र वाघमारे -  ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला.


या वेळेस व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. कल्याण सोनवणे डॉ.रमेश शिरसाठ,कनिष्ठ विभाग प्राचार्य प्रा. अमृत बनसोडे, लेफ्टनंट डॉ.निलेश हांडे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उमेशराज पनेरु व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राहुल पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला ज्युनिअर  मकरंद अनासपुरे यांनी लोकप्रिय मकरंद अनासपुरे यांची मिमिक्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा कार्यक्रम सादर करण्यात केला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी हा  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. 

या वेळेस संस्थेचे अध्यक्ष  व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप  कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार व सहसचिव प्रशासन ए.एम.जाधव यांचे  कार्यक्रमास बहुमोल  मार्गदर्शन लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या