जे. बी. सावंत हायस्कूल लोणेरे शाळेचा १९९६ दहावीचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा

 जे. बी. सावंत हायस्कूल लोणेरे शाळेचा १९९६ दहावीचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा 



पोलीस प्रवाह न्युज

लोणेरे - दि. - १०- जे. बी. सावंत हायस्कूल पन्हळघर  लोणेरे शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सोबत असलेल्या १९९६ च्या दहावी बॅचचा गेटटूगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात दि. ९ फेब्रुवारी  वर्ग  मोनेटर अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  माणगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण ६७ विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून दिलीप पवार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थीनीं यांचे मिलिंटरी रिटायर यजमान महेंद्र गजमल तसेच प्रकाश बाळू धोंडगे हे उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांचे तसेच  उल्लेखनीय कामगिरी तसेच उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असलेल्या तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या माजी विद्यार्थीचे शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थीनींच पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ३० वर्षांनी एकत्रित येऊन आगदी शिस्तबद्ध पद्धतीने उत्तम नियोजन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल कौतुक केले. नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देऊन जून्या आठवणी उजाळा दिला.  काहीना तर गहीवरुन आलं. खुप दिवसांनी एकत्रितपणे आल्याचं आनंद झाला. अनेकांनी  मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळा शिकतं असताना अनेक किस्से घडले होते. त्याची अनेकांनी आठवण करून दिली. खुप गप्पा गोष्टी करत एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला. अनेकांच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव दिसून आले. कोणी शिक्षक, इंजिनिअर, वायरमन, सरपंच अनेक हुद्यावर काम करणारे सवंगडी मिळाले.  रवि मोरे, राजेंद्र मोरे, संतोष करकरे, रंजना शिर्के, केशव जांबरे यांनी आपल्या सुंदर मंत्रमुग्ध आवाजात गाणी म्हटली.अनेकांनी मोजक्या शब्दांत मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमांचे उत्तम सुत्रसंचलन केशव जांबरे यांनी केले तर शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत उत्तम प्रस्तावना परेश अंधेरे यांनी मांडली. नंतर एकत्रितपणे स्नेह भोजने करण्यात आला. कार्यक्रमासाठी अरुण शिंदे,राजेश कदम, प्रकाश शिगवण, केशव जांबरे, सोमेश्वर टेंबे, जीजाबाई टेंबे, ताई अंबेकर, हारिदास शेडगे, राम भोस्तेकर, रघुनाथ बेंदूगडे, राजेश अंधेरे यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून नियोजन पारदर्शक कसे होईल याकडे लक्ष दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  विशेष सहाय्य दिलीप पवार यांनी केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी फोनवर नेहमीच संपर्कात राहून सहकार्य केले. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले. शेवटी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या मेहनतीने उत्तम पार पडले शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या