कोंकणी तानाबाना महिला शिवणकामाचा दिमाखदार शुभारंभ

 कोंकणी तानाबाना महिला शिवणकामाचा दिमाखदार शुभारंभ

कोंकणी तानाबाना संस्थेचा महिलांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणावर भर.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. २३- कोकणी तानाबाना युनिट सेंटरने महिलांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणावर भर देऊन महिलांच्या हाताला काम मिळावे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी दहिवली येथे महिलांनी शिवणकामाचे युनिट सुरु केले. याचा शुभारंभ दिनांक २१ जानेवारी रोजी समाजातील प्रतिष्ठित आणि पंच क्रोशीतील शिवणकाम करू इच्छिणाऱ्या महिलांनी कोंकणी तानाबाना सेंटर भेट देऊन केला. सेवा इंटरनॅशनल संस्थेने आणि ओरॅकल कंपनीने महिला उद्योजक तयार व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला.

यामध्ये माणगावमधील व्यापारी, महिला बचत गट, व पोस्को कंपनीने वेळोवेळी खूप सहकार्य केले. तसेच खेडेगावातील महिला प्रशिक्षण घेऊन अद्यावत मशीनवर कापडी पिशव्या शिवत एक नवीन ओळख निर्माण करत आहेत. पुण्याहून अमिता मिशी, अर्चना जोशी , प्रसाद सिरशीकर यांनी दहीवली येथे युनिट उभे राहण्यासाठी कष्ट केले. माणगाव तालुक्यातील कुलदीप पुरंदरे, आसावरी काळे, तेजस गांधी, डॉ. रश्मी वरखंडकर, गणेश खातू, संदीप घाग, तेजस गांधी आणि भोस्तेकर कुटुंब यांचे यात मोलाचे सहकार्य लाभले आहे.

तसेच शहरी भागातील महिलांना व तरुणींना काम करण्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांना अशा संधी क्वचितच असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील या महिलांना,तरुणींना छोटे-मोठे काम करण्यासाठी किंवा नोकरीसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. या ग्रामीण भागातील महिलांना कोकणी तानाबाना सेंटरने एक आशेची किरण दाखवून ग्रामीण भागातील महिलांच्या हातांना काम देण्याचा प्रयत्न केला आहे.

महिलांनी बनविलेले सुंदर बटवे, कापडी पिशव्या व इतर वस्तू सेंटरला भेट देणाऱ्या लोकांनी खरेदी केल्या असून. टी. एस. भोस्तेकर विद्यालयाने युनिटसाठी जागा देऊन दहिवलीमध्ये महिलांच्या उन्नतीच्या संधी निर्माण केल्या असे अमिता मिशी यांनी आवर्जून सांगितले. तिळगुळ व महिलांना भेटवस्तू देऊन कार्यक्रम  संपन्न झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या