माणगांवमध्ये ठाकरे शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध

 माणगांवमध्ये ठाकरे शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध


पोलीस प्रवाह न्युज

माणगाव- दि. २६- माणगांव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वररत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने जोरदार घोषणाबाजी करत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधान पुस्तिकेचे पूजन करून अमित शहा यांचा निषेध नोंदवला.

 यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा संघटक सुधीर सोनवणे, जिल्हा चिटणीस डॉ. अमेय (परेश) उभारे, माणगांव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, उपतालुकाप्रमुख मधुकर नाडकर, सहसंपर्क तालुका प्रमुख चंद्रकांत यादव, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, माणगांव शहरप्रमुख नगरसेवक अजित तार्लेकर, युवा सेना शहरप्रमुख अजिंकेश जाधव, उपशहर प्रमुख इब्राहिम करेल, युवासेना शहर समनव्यक ऋषी मोरे, शाखा प्रमुख हार्दिक काते अथर्व हाटे, शाखाप्रमुख शिवाजी घाग, जगदीश शिंदे आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा संघटक सुधीर सोनवणे यांनी आर. पी. आय. नेते केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री खा. रामदास आठवले यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, आठवले हे दलित नेते नाहीत. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि आंबेडकरी विचारांचा विसर पडला आहे. आठवले हे मनुवादयांचे गुलाम बनले आहेत. आठवले आर. एस. एस. चे गुलाम बनले आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे गुलाम बनले आहेत. त्यामुळे त्यांनी संविधान प्रेमाचा बेबनाव करू नये. जनता सुज्ञ आहे. जनता सर्व ओळखून आहे. आठवले यांना योग्य वेळी योग्य उत्तर जनता जनार्दन देईल यात तिळमात्र शंका नाही. भारतीय संविधान वाचविण्यासाठी यापेक्षा ही मोठे आंदोलन उभारावे लागले तरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध आहे, असे मत सुधीर सोनवणे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या