दिव्यांगांना काहीही कमी पडून देणार नाही- मंत्री रामदास आठवले

 दिव्यांगांना काहीही कमी पडून देणार नाही- मंत्री रामदास आठवले

दिव्यांगांच्या मदतीसाठी जनजागृती करा-खा. तटकरे यांचे आवाहन


माणगांव येथे दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप 

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. २३-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणालाही हाथ लावू देणार नाही आणि भारतातील कोणत्याही दिव्यांगांना काहीही कमी पडून देणार नाही. दिव्यांगासाठी आणि मागासवर्गीय समाजासाठी भारत सरकार अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्याचा लाभ सर्व समाजातील घटकांनी घ्यावा आणि आपल्या जीवनात आनंद मिळवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माणगांव येथे भारत सरकार मार्फत मोफत दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमात केले. 

  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्ष खा. सुनील तटकरे त्यांच्या उपस्थित माणगांव गांधी हॉल येथे भारत सरकार तर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य  वाटप कार्यक्रम दि. २२ जानेवारी रोजी संपन्न झाला. 


 'आपले आहे दिव्य अंग म्हणूनच तुम्हाला लढायची आहे जंग. आपले असले तरी दिव्य अंग पंतप्रधान नरेंद्र मोदी बदलत आहे जीवनाचे अंग' या काव्यातून दिव्यांगां बद्दलच्या आपल्या भावना आठवले यांनी व्यक्त केल्या. त्याला खा. सुनील तटकरे यांच्या सहित सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. 

 भारत सरकारने दिव्यांगांच्या साहित्य निर्मितीचा कारखाना उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे १९७२ मध्ये सुरू केला. १९७६ मध्ये दिव्यांगांच्या साहित्याची निर्मिती झाली.  भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपुर यांच्या मार्फत महाड, पोलादपूर झ माणगांव या तालुक्यातील १५८५ दिव्यांगांना २४५८ मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी भारत सरकारने १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी दिव्यांगांच्या साहित्यसाठी दिला.  संपूर्ण भारतात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याचे काम भारत सरकारतर्फे मोफत केले जात आहे. व्हीलचेअर, बैसाखी, कृत्रिम हात, पाय, श्रवणयंत्र, मोबाईल ई. विविध उत्तम प्रतीचं साहित्य यावेळी दिव्यांगांना मोफत देण्यात आलं. भारतातील विविध कंपन्यांनी सामाजिक निधीतून २% निधी सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करावेत, असा नियम व कायदा केला आहे.


    महाड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांचं म्हणणं अस होत की, आम्ही सगळे मानव आहोत. जाती, पंत वेगळे असले तरी आम्ही सर्व भारतीय एक आहोत. आम्ही भारताचे नागरिक आहोत. भारतातील सर्व नागरिकांनी एकत्रित राहिले पाहिजे. एक झाल्याशिवाय देशाला मजबूत करता येणार नाही.  पंतप्रधान मोदी यांचं 'सबका साथ सबका विकास' हे स्वप्न आहे. निवडणूकी वेळी राजकारण वेगळं असते. निवडणुकी नंतर सत्तेतील सरकारला विरोधकांनी साथ दिली पाहिजे. गेल्या दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रय रेषेवर आले आहेत. 


 यावेळी खा. तटकरे म्हणाले की, ईतर विकासकामे  व  प्रकल्प आपण करीतच आहोत. मात्र आज दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हर्ष आणि आनंद दिसला. त्यांच्या डोळ्यात हे साहित्य मिळाल्यावर आनंदाश्रू उमलले. या छोट्याशा मदतीमुळे दिव्यांगांच्या जीवनात मोठा बदल घडून येणार आहे. या साहित्याचा उपयोग त्यांच्या जीवनात आनंद देणारा ठरणार आहे. हाच आनंद कोट्यवधी विकास कामांपेक्षा माझ्या मनाला सुखावून जात आहे. हे साहित्य वाटप केल्याने एक प्रकारचे समाधान मला लाभले आहे. दिव्यांगांना मदत करण्यासाठी आणि त्यांना दिव्यांग साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात जनजागृती करून जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन खा. तटकरे यांनी केले.  त्यांच्या जीवनात कायम आनंद राहो आणि त्यांचं जीवन सुखी राहो अशा शुभेच्छा सुद्धा यावेळी खा. तटकरे यांनी दिल्या. 

   या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, रा. कॉ.  जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे ,राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रवक्त्या ऍड सायली दळवी, तालुका अध्यक्ष बाळाराम (काका)नवगणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा संगिता बक्कम, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शादाब गैबी, जेष्ठ नेते महादेव बक्कम, उपनगराध्यक्ष हर्षदा सोंडकर माणगांव शहराध्यक्षा योगिता चव्हाण,  उपाध्यक्ष  श्रद्धा यादव, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, सुमित काळे व  के. डी. गोटे एलिम्को मुंबई चे प्रमुख, अभिलाषा ढोरे, ज्युनिअर मॅनेजर, डॉ गौरिश साळुंके पी & ओ, डॉ आकाश यादव पी & ओ, डॉ अक्षय मोरे पी & ओ, रुपेश पोवार ई डी पी ,विराज .एलिम्को चे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या