माणगांव तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांनी घेतली मा. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची सदिच्छा भेट.


पोलीस प्रवाह न्युज

माणगांव- दि. २८- तालुक्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी विराजमान होते. शासकीय नियमानुसार त्यांची कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदी बदली झाली. माणगांव तालुक्यात पो. नि. राजेंद्र पाटील पाटील आपली ड्युटी सांभाळताना सामाजिक सलोखा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. तसेच समाजातील प्रत्येक स्तरात आणि जनमानसात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. राजेंद्र पाटील साहेब कुठल्याही क्षेत्रातील सामजिक नेतृत्व असो त्यांच्या मना-मनात रुजले. समाजातील अगदी तळा-गाळापर्यंत पोहचले. याचाच  प्रत्यय माणगांव पोलीस ठाण्याचे ह्या अगोदरचे पोलीस निरीक्षक मुंबईकडे जात असतानाच माणगांव तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांनी पो. नि राजेंद्र पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

   यावेळी माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या समवेत माणगांव तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव तालुका अध्यक्ष उमेश जाधव, मा. जि. प. सदस्य किसन जाधव, तालुका खजिनदार बबन कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय कोळी, निजामपूर विभाग अध्यक्ष नथुराम वाघमारे, सचिव सुदाम जाधव, उपाध्यक्ष दत्ता पवार व समाजबांधव लक्ष्मण जाधव, कृष्णा वाघमारे, नारायण वाघमारे, विष्णू जाधव, सुनिल कोळी, रामदास कोळी, किसन कोळी आदी उपस्थित होते.

   यावेळी आदिवासी कातकरी समाजबांधवांनी पो. नि. राजेंद्र पाटील यांची भेट घेत आदिवासी समाज बांधवांच्या विविध समस्या मांडल्या लवकरच आपली पदोन्नती होऊन आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय द्यावा अशी विनंती करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या