पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेश अध्यक्षपदी तर नवनाथ कापले यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या कोकण विभाग प्रमुख पदी निवड
पोलीस प्रवाह न्युज
रायगड - दि. २८- न्यूज 18 लोकमतचे पुणे जिल्हा प्रतिनिधी गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी बिनविरोध निवड तर पोलीस प्रवाह चे संपादक नवनाथ कापले यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या कोकण विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.
पुण्यात पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत राज्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच तसेच ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई ,अविनाश वानखेडे ,संघनेचे संस्थापक संजय भोकरे आणि रणधीर कांबळे,विश्वास आरोटे यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली.यावेळी राज्यातील विविध जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार बांधव मोठ्या संखेत उपस्थित होते.
यापुढे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून शासनाच्या सर्व योजनांचे जिल्हानिहाय सर्व्हे करून त्यासंदर्भातील अहवाल जाहीर केले जाणार असल्याची घोषणा करत ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांचा विकास आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच संघटना महिला पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबध्द राहील असं आश्वासन यावेळी वाकडे यांनी दिले. पत्रकारांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध भागात संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या समस्या व आव्हाने याबाबतीत चर्चा झाली. आज पर्यंत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा विश्वास आरोटे यांनी मांडला.नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.कोकण विभागासाठी नवनाथ कापले पत्रकार हल्ला कृती समितीच्या माध्यमातून संघटनेला ताकद देतील असा विश्वास अध्यक्ष वाकडे यांनी व्यक्त केला.कार्यक्रमासाठी डिजिटल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, अतुल परदेशी,पश्चिम महारष्ट्र विभागीय अध्यक्ष नितिन शिंदे, संपर्क प्रमुख पराग कुंकुलोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगदाळे,प्रसिद्धि प्रमुख नवनाथ जाधव,वैभव स्वामी,अतुल क्षीरसागर, जमीर सय्यद, महादेव मासाळ,बेलाजी पात्रे, सुनील बेनके,सचिन चपळगावकर यांनी योगदान दिले.





0 टिप्पण्या