धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी-चिंचवड- दि. १६- धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, संत तुकाराम नगर यांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराजांना हार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी केले होते. या प्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण रानवडे सर, कायदे तंज्ञ सूरजजी खाडे सर, लहुजी सेनेचे राजूभाऊ आवले, मुस्लिम समाजाचे जमीलभाई शेख, शिवसेनेचे संघटक भोळाराम पाटील, शाखा अध्यक्ष अमित जी फळके, प्रतिष्ठानचे संघटक सुनील दादा ढोकळे, युवती पिंपरी-चिंचवड अध्यक्षा निलम संतोष म्हात्रे, गणेश गुलदगड, मोहन कांबळे, ऋषी ढाकणे, संतोष वाघमारे, हसन मुलानी, लक्ष्मण लुगडे युवा सेनेचे प्रणव वाजे, मनीष म्हात्रे, निखिल म्हात्रे तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व विचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या कार्यावर मार्गदर्शन केले व त्यांच्या आदर्शांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




0 टिप्पण्या