कुणबी युवा मंच मुंबई सामाजिक संघटना यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
पोलिस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. ३०- कुणबी युवती महीला सामाजिक संघटना (मुंबई) यांच्या माध्यमातून दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ज्ञानेश्वर खराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुजराती सेवा मंडळ माटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुणबी समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर तसेच समाज बांधव महिला वर्ग अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव सत्यजीत भोनकर यांनी करून आलेल्या सर्व समाज बांधव व प्रतिष्ठीत मान्यवर यांचे शब्दसुमनाने स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक वैभव शिंदे यांनी मांडले व दिनदर्शिका प्रकाशन करण्यामागचे उधिष्ठ खुप चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितले व मंच्याचे कार्य काय असत हे आवर्जून सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात आणि मोजक्या शब्दांत वेक्त केले. तर उपाध्यक्ष दत्तगुरु उभारे व अध्यक्ष ज्ञानेश्वर खराडे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य यांची सविस्तर माहिती दिली तसेच राकेश भोस्तेकर यांनी आपले मनोगतात संघटनेचे कार्याचे कौतुक केले तर महिला अध्यक्षा रुपेशा राकेश भोस्तेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाला उपस्थितांचे सत्यजीत भोनकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी कार्यक्रमाला कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगाव पदाधिकारीज्ञानेश्वर खराडे - अध्यक्ष, दत्तगुरू उभारे - उपाध्यक्ष, सुनिल माठल - उपाध्यक्ष, सत्यजित भोनकर - सचिव, नारायण शिंदे- खजिनदार, काशिनाथ शिंदे - सहसचिव, विनायक म्हस्के - सहखजिनदार, नरेश भोसले - सहखजिनदार, संतोष उंडरे - संपर्कप्रमुख, राजेश शिर्के - संपर्कप्रमुख, संतोष उभारे - संपर्कप्रमुख, श्रीधर भोईर - सल्लागार/स्टारप्रचारक, राजेश शिर्के - सल्लागार, मधुकर टेंबे - सल्लागार, सदस्य चंद्रकांत टेंबे, श्रीराम जुमारे, वैभव शिंदे, किरण शिगवण, रुपेश वाढवल, रूपेक्षा भोस्तेकर -महिला अध्यक्षा, अस्मिता शिंदे - उपाध्यक्षा, सलोनी पाटेकर - सहसचिव, स्वप्नाली शिंदे - संघटक, स्वरूपा भोईर संपर्कप्रमुख, कल्पना खराडे - संपर्कप्रमुख, दिपाली शिर्के - सल्लागार, सदस्य विशाखा तेटगुरे, समीक्षा दळवी, चेतना तेटगुरे, बेबी सुरेश टेंबे तसेच माणगाव तालुक्यातील अनेक समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.




0 टिप्पण्या