महिलांच्या सक्षमीकरणासाठी सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या मदतीने महिला उद्योजकता प्रकल्प कार्यक्रम.

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या मदतीने महिला उद्योजकता प्रकल्प कार्यक्रम.

कोकणी तानाबाना युनिट सेंटरचा पुढाकार


दहिवलीतील शाळेत महिलांच्या शिवण कामाचा २१ जानेवारीला शुभारंभ

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगांव- दि. १९- कोकणी तानाबाना युनिट सेंटरने महिलांच्या सशक्तीकरण व सक्षमीकरणावर भर देऊन महिलांच्या हाताला काम मिळावे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी माणगाव तालुक्यातील दहिवली येथील टी.एस.भोस्तेकर माध्यमिक शाळेत मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत महिलांच्या शिवण कामाला सुरवात होणार आहे. तरी या संधीचा लाभ माणगाव व मोर्बा विभागातील महिलांनी व तरुणींनी घ्यावा असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

             शहरी भागातील महिलांना व तरुणींना काम करण्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांना अशा संधी क्वचितच असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील या महिलांना,तरुणींना छोटे-मोठे काम करण्यासाठी किंवा नोकरीसाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. या ग्रामीण भागातील महिलांना कोकणी तानाबाना सेंटरने एक आशेची किरण दाखवून ग्रामीण भागातील महिलांच्या हातांना काम देण्याचा प्रयत्न केला आहे. संसाराच्या फाद्यांना बांधलेला महिलांचा झोका ज्यावेळेस सृजनात्मक काम सुरु केल्यानी स्वप्नांना घेऊन उंच माझा झोका प्रमाणे गरुड भरारी घेऊन ती आनंदीत होऊन आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना महिला सक्षमी करणाबाबत माहिती देते. असाच एक उपक्रम माणगाव तालुक्यातील दहिवली,ढाकशेळी,देगावच्या १५ महिलांनी एकत्र येऊन सुरु केला आहे. श्री. टी.एस.भोस्तेकर शाळेच्या आवारात  महिलांनी कापडी पिशव्या शिवून कामाचा शुभारंभ केला आहे. परदेशातील एक ऑर्डर व पुण्यातून लगेच दुसरी ऑर्डर पूर्ण करून ग्रामीण भागातील या महिलांचा आनंद,उत्साह द्विगुणित झाला आहे. माणगाव,मोर्बामधील लेडीज टेलर,व्यापारी,प्रतिष्ठित महिला प्रतिनिधी व नव्याने शिवणकामात जोडू इच्छिणारी महिलांनी,तरुणींनी दि.२१ जानेवारीला वरील वेळेत उपस्थित राहून कोकणी तानाबाना सेंटरला भेट द्यावी. या सेंटरला  जोडून कामाला हातभार लावणाऱ्या महिलांना खास भेट वस्तू व पुढील शिवण कामाच्या प्रशिक्षणात विशेष सूट दिली जाणार आहे. महिलांच्या नवीन सुरु झालेल्या या युनिटला माणगाव परिसरातील महिलांनी,तरुणींनी,प्रतिष्ठित महिलांनी भेट देऊन सामील होऊन महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन कोकणी तानाबाना   सेंटर युनिट प्रमुख साक्षी म्हापरळकर यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या