कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे स्कूल बॅग आणि वह्या वाटप
कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ट्रस्ट संस्थापक विश्वस्त निलेश सत्वे आणि टीमने माणगांव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदच्या ५७ शाळांना वह्या वाटप करण्यात आले.
यामध्ये रा. जि. प. शाळा जावळी, मुगवली, हातकेली, आडघर, गारळ, लोणशी, वावे, वडगाव कोंड, वडगाव, वडघर- गोरेगाव, खरवली, वाघोसे, बामणोली, निळगून, राजिवली, सुरव/निजामपूर, उमरोली तर्फे खरवली, चेरवली, सुरव तर्फे तळे, साले, तिलोरे, कोशिंबळे, दाखणे, काळवण, कशेने, कालवण आदिवासी वाडी, विघवली, मूठवली तर्फे निजामपूर, कुशेडे तर्फे तळे, वारक, माकटी, कळमजे, रिले, विहुले, नळेफोडी, निवाची नळेफोडी, बोरघर, वडघर, गोवेले चिकणी मानसई, गोवेले, फलानी, मढेगांव, मढेगांव कोंड, नांदवी, केस्तुली, तारंबळी वाडी, टोलवाडी, वाकी, हरकोल कोंड, वडवली कोंड, तारणेवाडी, दहिवली कोंड, शिरवली तर्फे गोवेले, रानवडे कोंड, भांडवली, कुरवडे, नवघर या शाळेतील मुलांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात केले. तसेच ६० कॉलेज विध्यार्थी यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला समाजकुणबी समाजोन्नती संघ परेल मुंबई शाखा माणगांव अध्यक्ष निलेश बाळकृष्ण तळवटकर, स्वयंम फॉउंडेश अध्यक्ष सुनिल शिंदे, ऍड. वैभव गोसावी, शेअरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई, रवि जाधव, कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक विश्वस्त निलेश सत्वे, कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामीण अध्यक्ष संतोष खाडे, प्रकाश मोरे, दिलीप मोरे, अशोक पालकर, सचिन मोरे, महेश महादे, नितीन मोरे, राकेश अंधेरे, रवींद्र माने, संदीप ढेपे, नितीन शिंदे, नितीन कासरेकर, पंकज पालकर, ज्ञानेश्वर मोरे, कु.साहिल म. मोरे, शैलेश पालकर, सुभाष तेटगुरे, विदेश चेरफळे, निकेश सत्वे, महेंद्र वाघोस्कर, विश्वनाथ मुंडे, रोनक पालकर, नरेश कालेकर, प्रदीप आडीत, मदन आवाद, विजय बक्कम, मंगेश जाधव, भारत उंडरे, विरेन भोईर, विध्यार्थी पालकवर्ग मुख्याध्यापक , मुख्याध्यापिका व इतर सहकारी शिक्षिका, शिक्षक, सरपंच, पोलीस पाटील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.





0 टिप्पण्या