रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा रेपोली तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १७- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या वर्षी रा. जि. प.शाळा रेपोली आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ई. १० वी ते पदवी पर्यंत २९ विद्यार्थ्याचा सत्कार ग्रामस्थाच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना कागदपत्रे ठेवण्यासाठी फोल्डर म्हणून बक्षीस देण्यात आले.
गावातील प्रथमच एल .एल .बी. झालेली कु. रश्मी सागर जांबरे व डोंबिवली येथे तलवार बाजीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त करणाऱ्या कु. श्रेया राकेश भोस्तेकर यांना शाल व सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यासाठी लागणारी सर्व बक्षिसे गोविंद दगडू जांबरे यांच्याकडून देण्यात आले. जयश्री शंकर जांबरे -आरोग्य सेविका, शकुंतला धामणे आरोग्य सेविका, विमल पांडुरंग पिसाळ- निवृत्त अंगणवाडी मदतनीस, शरद कमलाकर मोरे -निवृत्त पोलीस पाटीलयां ना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ ठेऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणगौरव सोहळा रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोळी या ठिकाणी मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.
या गुणगौरव सोहळ्यास शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष कल्पेश पिसाळव सर्व कमिटी सदस्य, गाव कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ बेदुगडे, ग्रामपंचायत सदस्या कांताताई बेडुगडे, स्वाती आवाद, युवा कमिटी अध्यक्ष सिद्धेश शिगवण, शाळेतील शिक्षक तोरमल, जाईबाय, अंगणवाडी सेविका तेजस्विनी भोईर, दत्तात्रेय कडू, केशव जांबरे, नवनाथ ढमाळ, बाबुराव ढमाळ, रवींद्र जांबरे, मारुती जांबरे, महादेव जांबरे, वासुदेव जांबरे , महादेव बोंडीलकर, रामदास बोंडीलकार, माजी उपसरपंच गोपाल नाडकर, माजी सरपंच शंकर शिगवण, सुभाष शिगवण, युवा मराठी उद्योजक राकेश भोस्तेकर , प्रवीण मोरे, सुधीरदादा मोरे जनार्दन ढमाळ, स्वदेश फाउंडेशनचे राजेंद्र बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गावातील ज्येष्ठ बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रत्नाकर महाले व सुनील गोरेगावकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद शंकर दगडू यादव यांनी भूषविले. कार्यक्रमाची संकल्पना केशव जांबरे यांनी मांडली. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ मुंबईकर मंडळ आणि शाळा व्यवस्थापन समितीने मेहनत घेतली.





0 टिप्पण्या