रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा खडकोली तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे रा. जि. प.आदर्श केंद्र शाळा खडकोली शाळेकडून ई. १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच शैक्षणिक वर्ष २३-२४ मध्ये स्पर्धा परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणगौरव सोहळा ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ या ठिकाणी मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.
या गुणगौरव सोहळ्यास ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळ सरपंच शितल वारीक, उपसरपंच प्रदीप घोसाळकर, सदस्य प्रमिला पवार, संदेश पवार, नंदिनी पेंढारी, अपर्णा लोखंडे, निलीमा शिंदे, खडकोली, वाघोसे, मांगरूळ गावातील सर्व ग्रामस्थ, तुकाराम पवार, नामदेव राणे, प्रताप सावंत, दिपक चव्हाण, शंकर पवार, रंजन सुतार , पांडुरंग महाडिक, हरिश्चंद्र सुतार, अनंत लोखंडे, दिपक लोखंडे, संजय शिगवण, विरेंद्र शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती खडकोली अध्यक्ष वृषाली पवार, उपाध्यक्ष मोहिनी सुतार, सदस्य अनिता राणे, अर्पिता महाडिक, वैशाली सुतार, प्रिया अंधेरे, चैताली सुतार, दर्शना राणे, पुष्पलता अंधेरे, ग्रामसेविका गजमल, अंगणवाडी सेविका अंधेरे, घोसाळकर, मुख्याध्यापक कुंजलता पाटील, मंगला भोसले, विठाबाई लाखाडे मॅडम,परेश अंधेरे उपस्थित होते. या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश अंधेरे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका कुंजलता पाटील यांनी केले.




0 टिप्पण्या