श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ४० हजारहून अधिक महिलांना लाभ- जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. १८- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा राज्यातील करोडो महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार अनिकेत तटकरे तर सदस्यपदी तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह दोन अशासकीय सदस्यांची निवड रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामध्ये शिवसेना दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व भारतीय जनता पक्षाचे प्रशांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. सदर कमिटीची मिटींग दि. १६ ॲागस्ट रोजी म्हसळा, श्रीवर्धन येथे झाली. यावेळी आढावा घेताना श्रीवर्धन तालुक्यामध्ये १४२८१ महिलांचे अर्ज आले होते. यापैकी १४१०५ अर्ज ॲानलाईन मंजूर करण्यात आले असून म्हसळा तालुक्यामध्ये ९८१२ अर्ज आले. यापैकी ९३५३ ॲानलाईन अर्ज मंजूर केले. तर तळा तालुक्यातील ७३२० अर्ज दाखल करण्यात आले। यापैकी ७११६ अर्ज ॲानलाईन मंजूर केले. माणगाव तालुक्यातील १४९३० अर्जापैकी १४७२० अर्ज ॲानलाईन मंजूर केले. रोहा तालुक्यातील ४३२० अर्जापैकी ४०९१ अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्याचा पूर्ण भाग समाविष्ट असून माणगाव, रोहा तालुक्यातील काही भाग समाविष्ट असल्याने श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतील जवळपास ४०,००० हून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही अर्जांमध्ये त्रूटी असल्याने व काही महिलांनी फॅार्म न भरल्याने त्यांना लाभ मिळाला नसला तरी त्यावर उपाययोजना करून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यात यावा यासाठी सर्वतोपरीनप्रयत्न करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा श्रीवर्धन विधानसभा माझी लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचे सदस्य प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.



0 टिप्पण्या