रायगड प्रज्ञाशोध सराव परीक्षेत माणगाव तालुका अव्वल स्थानी

 रायगड प्रज्ञाशोध सराव परीक्षेत माणगाव तालुका अव्वल स्थानी      



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. १८- रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक पूनीता गुरव  यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या रायगड टॅलेंट सर्च{RTS} परीक्षेचा पहिला पेपर दिनांक दि. ३ ऑगस्ट  रोजी पार पडला. या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. जवळजवळ ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून परीक्षा दिली.

     दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या सराव परीक्षेची २५ विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेत माणगांव तालुक्याने बाजी मारली असून यामध्ये चार विद्यार्थी हे २०० पेक्षा जास्त गुण मिळवणारे ठरलेले आहेत. माणगाव तालुक्यातील गोरेगाव मराठी केंद्रातील भिंताड या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. अक्षरा वैभव सुर्यवंशी हिने ३०० पैकी २६४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले. तर रा. जि. प. शाळा पाणोसे कोंड तालुका माणगाव येथील कु. सार्थक अंकुश जाधव याने २३६ गुण मिळवून गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकावला. रा. जि. प. शाळा नागाव, केंद्र गोरेगाव मराठी येथील कु. आदित्य दादासाहेब निंबाळकर याने २१६ गुण मिळवून तो सोळाव्या स्थानावर राहिला. तर रा. जि. प. शाळा पाणोसे कोंड येथील कु. प्रथमेश नरेश जाधव हा २१२ गुण मिळवून अठराव्या स्थानावर राहिला आहे.

 ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी व मुलांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळण्यासाठी RTS परीक्षा एक मोलाचा दगड ठरणार आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, रत्नाकर पाटील, सर्व जिल्हा, तालुका,केंद्र कमिटी यांचे खूप मोलाचे योगदान लाभले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या