स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीमंतयोगी प्रतिष्ठान दिवा मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

 स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीमंतयोगी प्रतिष्ठान दिवा मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप



पोलीस प्रवाह न्यूज

    भारत देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त  श्रीमंतयोगी प्रतिष्ठान दिवा यांच्या वतीने माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उणेगाव, पन्हळघर बुद्रुक आदिवासीवाडी, पन्हळघर खुर्द, पन्हळघर बुद्रुक, अंबर्ले, पहेल, नागाव, कन्या शाळा गोरेगाव इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि श्री शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा यांचे वाटप करण्यात आले. कोकणातून रोजगारासाठी मुंबईला गेलेल्या चाकरमान्यांच्या माध्यमातून तयार झालेली 'श्रीमंतयोगी प्रतिष्ठान दिवा' या संघटने कडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य केले जातात. महापूर, निसर्ग वादळ, कोरोना यासारख्या आपत्तीमध्ये देखील श्रीमंत योगी प्रतिष्ठान मार्फत अनेक ठिकाणी मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने प्रतिष्ठान मार्फत माणगाव तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या  शाळेत आलेल्या प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांना खूप समाधान वाटले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वजण भारावून गेले.


याप्रसंगी उणेगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द, पहेल, नागाव, अंबर्ले या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ, उद्योजक, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, पत्रकार, कुणबी एकता मंचाचे सदस्य, महिला मंडळ, कर्मचारी, युवक मंडळ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर या कार्यक्रमासाठी श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अरविंद उभारे ,अध्यक्ष अजय चव्हाण, उपाध्यक्ष  राहुल कानसकर, सचिव सुधाकर हर्णेकर, कृष्णा चौगले, संकेश भावे, तुकराम उढंरे, संभाजी कणसे, अनिल करकरे, दिनेश सावंत, ऋषी सुर्वे, संदीप वारंग, रवि शेजवळ, सुनील शिर्के, सचिन घाणेकर, दत्ता कोशिमकर ,गणपत साळुंखे, बलराज शिंदे, अरविंद घोगळे आदी मान्यवर उपस्थित होते. पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द, अंबर्ले, नागाव, उणेगाव, पन्हळघर बुद्रुक आदिवासीवाडी, कन्या शाळा गोरेगाव, पहेल या शाळेच्या शिक्षकांनी प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानून पुढील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीची हार्दिक शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या