पिंपरी चिंचवड येथे पहिल्यांदाच कुडो वर्ल्ड चॅम्पियन तेरागुची नॉरिहाईडे, जपान यांच्या मार्फत कुडो क्रीडा प्रकारचे विशेष प्रशिक्षण
पोलीस प्रवाह न्यूज
पुणे- दि. १३- कुडो क्रीडा प्रकारास क्रीडा व युवक सेवा मंत्रालय, भारत सरकार ची मान्यता आहे कुडो शालेय क्रीडा स्पर्धेत देखील आहे तसेच स्वरक्षण साठी अंत्यत प्रभावी असा खेळ असून विशेष बाब म्हणजे कुडो राष्ट्रीय खेळाडूंना भारत सरकार द्वारे थेट सरकारी नोकरीत आरक्षण आहे गेल्या महिन्यात म्हणजे मे २०२४ मध्ये कुडोच्या ४ राष्ट्रीय पदक विजेत्याना इन्कम टॅक्स विभाग, भारत सरकार, मुंबई ऑफिस मध्ये सामील करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे खेळापासून थेट शासकीय नोकरी हे भविष्य पाहता भारतातील कुडो खेळाडूंच्या कौशल्यात वाढ़ करून जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी तसेच कुडो खेळाचा योग्य पद्धतीने प्रचार प्रसार होण्यासाठी कुडो इंडिया प्रमुख मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२७ व २८ जून २०२४ रोजी १) पवार इंटरनॅशनल स्कुल, हिंजेवाडी, २) ज्ञानप्रबोधिनी क्रीडा कुल, निगडी, ३) डी. वाय. पाटील ज्ञानशांती स्कुल, रावेत, ४) मामासाहेब मोहोळ मेमोरियल स्कुल, पिरंगुट आणि ५) पोलीस ट्रैनिंग सेन्टर, हडपसर येथे कुडो वर्ल्ड चॅम्पियन तेरागुची नोरीहाईडे (जपान), मेहुल वोरा- प्रमुख प्रशिक्षक - कुडो इंडिया यांच्यामार्फत पोलिसांना विशेष ट्रैनिंग देण्यात आले. अश्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिबिराचे आयोजन पुणे जिल्ह्यात केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक (आय. पी. एस.) राजेंद्र डहाळे यांच्या मार्फत मेहुल वोरा, तेरागुची नोरीहाईडे, प्रांशू वोरा आणि अरविंद मोरे यांचा मार्फत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच २९ जून २०२४ रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील निवडक खेळाडूंकरिता देखील कुडो वर्ल्ड चॅम्पियन तेरागुची नोरीहाईडे आणि ब्लॅक बेल्ट - जपान प्रांशू मेहुल वोरा यांच्या मार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
पुणे जिल्हा प्रशिक्षक राजू गोसावी, किशोर शिंदे, गीता जगताप, लेखा लोखंडे, प्रशांत रोकडे, वैभव सळुंखे, ऋषिकेश जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, हिमाली वहाळकर, राकेश यादव यांच्या मार्फत २२५ विद्यार्थी आणि ३५ कोच, ब्लॅक बेल्ट सहभागी झाले होते. कुडो शिबिराचे आयोजन अरविंद मोरे, उपाध्यक्ष - कुडो महाराष्ट्र, शीतल मोरे उपाध्यक्ष - पुणे जिल्हा यांनी केलें, सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमाली वहालकर, खजिनदार -पुणे जिल्हा व आभार राकेश यादव, सचिव -पुणे जिल्हा यांनी केलें.





0 टिप्पण्या