लोणेरच्या तंत्रशास्त्र विद्यापिठातील वित्त अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक

 लोणेरच्या तंत्रशास्त्र विद्यापिठातील वित्त अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक

पोलीस प्रवाह न्यूज



माणगांव- दि. ५- ठेकेदाराचे बील अदा करण्यासाठी त्याच्याकडून लाचेची मागणी करत ती स्वीकारत असताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वित्त अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार  यांनी लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाच्या पदविका विभागातील सभागृह नूतनीकरणाचे काम केले होते. या कामाचे बील मंजूर करून ते अदा करण्यासाठी विद्यापिठातील वित्त अधिकारी  ओंकार रामचंद्र आंबपकर (वय ५५, सध्या रा. आनंदनगर सोसायटी लोणेरे) याने तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार काल शुक्रवारी सायंकाळी ४ वा. लाचलुचपत विभागाने सापळा रचून आंबपकर याला जाधव यांच्या कडून लाचेची रक्कम रू ८१ हजार  स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक ठाणे परिक्षेत्र सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच उप अधीक्षक  शशिकांत पाडावे, सहा. फौजदार विनोद जाधव, सहा. फौजदार अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार सागर पाटील यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या