वडूज येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
सातारा- दि. १८- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A गटाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती वडूज येथे मोठया उत्साहात पार पडली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे (डॅडी) यांच्या नेतृत्वाखाली सदरचे कार्यक्रम ठेवण्यात आले. भीमाच्या प्रतिमेच्या पूजनासाठी वडूज एसटी स्टँड परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. निळे पताके, निळे झेंडे, एसटी स्टँड परिसरात लावण्यात आले होते. ठीक ११ वाजता मानवन्दना व बुद्धवन्दना घेण्यात आली.
यावेळी वडूज नगराध्यक्ष मनीषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेवक जयवंत पाटील, नगरसेवक सचिन माळी, नगरसेवक प्रतीक बडेकर, नगरसेवक काका बनसोडे, बनाजी पाटोळे, गणेश ओडसे, कार्यकारी नगरसेवक बापू वायदंडे, तुषार बैले, ओंकार चव्हाण, महिला नगरसेविका शोभा बडेकर, रिपब्लिकन A चे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे (डॅडी), आयटी सेलचे जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ भोसले, युथ चे जिल्हा सचिव अनिल उमापे, तालुका उपाध्यक्ष विजय बनसोडे ,खटाव तालुका कार्याध्यक्ष सचिन भंडलकर, युथ तालुका अध्यक्ष अमोल बुधावले, निलेश जाधव, अतुल गोले, कोषाआध्यक्ष निलेश अघेडकर, तालुका सल्लागार विजय यादव, वडूज शहर अध्यक्ष प्रशांत भोंडवे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा जाधव, प्रभारी तालुका अध्यक्ष ज्योती यादव, संयोगिता जाधव, वैभवी जाधव, संजना जाधव, हिरकणी जाधव, तन्वी भोंडवे, अक्षय थोरवे व सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थितीत होते.
वडूज च्या नगराध्यक्ष मनीषा काळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. दुपारी २ वाजता गोड भोजन देण्यात आले. ठीक ७:३० वाजता महामानावाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, टायगर ग्रुप चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश बाबा जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून मिरवणूकीचा प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीमध्ये पारंपारीक मर्दानी दांडपट्टा, हलगी अशा पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचे वैभव कोळी यांनी सूत्रसंचालन केले व नगरसेवक प्रतीक बडेकर यांनी आभार मानले.



0 टिप्पण्या