तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार
शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांचा शिवसेनेत प्रवेश
आ. जयंत पाटीलांना मोठा धक्का
पोलीस प्रवाह
माणगांव : दि. २८ - देशात सर्वत्र लोकसभा निवडणूक पार पडत आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. प्रचार सभा, बैठका, पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यातच दक्षिण रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा खिंडार पडला असून आ. जयंत पाटीलांना मोठा धक्का बसला आहे. शेकापचे माणगांव तालुका चिटणीस यांनी शेकापला रामराम ठोकत आ. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी आ भरत गोगावले, शिवसेना प्रवक्ते ऍड राजीव साबळे ,जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर , नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार , नगरसेवक कपिल गायकवाड , संपर्ग प्रमुख अरुण चळके, तालुका प्रमुख ऍड महेंद्र मानकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे ,शहरप्रमुख सुनिल पवार, मा. सभापती सुजित शिंदे, मा. सभापती रामभाऊ म्हसकर, विरेश येरुणकर.आदी मान्यवर उपस्थित होते.



0 टिप्पण्या