मोर्बामध्ये अंबुजा सिमेंट कडून इफ्तार पार्टी.



पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि. ११- मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना. या महिन्यात ३० रोजे म्हणजे विना अन्न पाणी विना थुंकी गिळता मुस्लिम बांधव अल्लाह शी ईबादत करतात. सायंकाळी च्या अजान नंतर इफ्तारी करत रोजा सोडण्यात येतो. यावेळी अनेक मंडळे आणि मित्र परिवाराकडून इफ्तार पार्टी देण्यात येते. अशाचप्रकारे दि. ९ एप्रिल रोजी माणगांव तालुक्यातील मोर्बा येथे अंबुजा सिमेंट (अदानी सिमेंट) कंपनी कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंबुजा सिमेंट चे विक्रेते वांगरे ट्रेडर्स, रॉयल ट्रेडर्स, टोळ इंटरप्रायझेस, इनामदार ट्रेडर्स, सादिक मुकादम, मोर्बा ग्रामपंचायत सरपंच शौकत रोहेकर, उपसरपंच राजू मोरे व माणगाव तालुक्यातील कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील विविध कंत्राटदार उपस्थित होते.

  या कार्यक्रमाच्या आयोजनात अंबुजा सिमेंट कंपनीचे इंजिनिअर शुभम पवार,मार्केटिंग अधिकारी ऋषीकेश चांडक,मयुर पवार,यांनी महत्वाची भूमिका बजावली.या कार्यक्रमात इफ्तार पार्टी सोबतच अंबुजा सिमेंट आणि कंपनीची इतर उत्पादने तसेच अंबुजा कंपनीची सर्टिफाईड कार्यप्रणाली याची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित सर्व बांधवाना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.एकंदरीत सर्व कार्यक्रम उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनामुळे उत्साहात पार पडला.उपस्थित मुस्लिम बांधव व मान्यवरांनी अंबुजा सिमेंट कंपनी आणि आयोजकांच्या कार्यक्रम आयोजनाचे कौतुक केले.