लाटवण माऊली मंदिराचा १९ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात.

 लाटवण माऊली मंदिराचा १९ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात.

पारंपरिक व धार्मिक भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न.

पोलीस प्रवाह न्यूज

मंडणगड- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील ४ डोंगरांच्या कुशीत वसलेल्या लाटवण गावाला वारकरी संप्रदायाचा पूर्वपार वारसा लाभला आहे. याच गावच्या मध्यस्थानी असलेल्या ज्ञानेश्वरवाडी मध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे मंदिर आहे. मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे या मंदिराच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला जातो. गेली १९ वर्षीची ही परंपरा आहे. यावर्षीही हा १९ वा वर्धापन दिनाचा सोहळा ९ आणि १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पारंपरिक  धार्मिक कार्यक्रमानी पार पडला. विशेष या वर्षी वाडीतील युवकांचे मंडळ संत श्री ज्ञानेश्वर सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ग्रामीण व शहरी मंडळाने नियोजन आणि व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर ग्रामीण मंडळ श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ, माऊली सेवा महिला मंडळ ज्ञानेश्वरवाडी तील ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.


या वर्धापनदिनी दि.९ एप्रिल रोजी सकाळी ज्ञानेश्वर माऊलीला अभिषेक, घटस्थापना, ध्वजपूजन, वीणा पूजन, ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी आयोजक  मंडळाचे भजन, ह.भ .प दिनेश महाराज पोस्टूरे शिगवण आंबवणे यांचे प्रवचन सायंकाळी सत्यनारायण पूजा व तिर्थप्रसाद. त्यानंतर हरिपाठ, रात्री दिनेश महाराज पोस्टूरे यांचे कीर्तन, जागर व भजनाचा कार्यक्रम शारदा महिला भजनी मंडळ चिंचाळी दापोली यांनी सादर केला. बुधवार दिनांक १० एप्रिल सकाळी ५ ते ६ काकड आरती त्यानंतर ११ ते १२:३० पर्यंत काल्याचे कीर्तन,१२:३० ते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या