जनतेला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या करमाळा पंचायत समिती अधिकाऱ्यांनी त्यांच्याच आवारातील स्वच्छतेकडेही लक्षद्या - प्रवीण अवचर


पोलीस प्रवाह न्यूज 

करमाळा तालुका पंचायत समिती आवारा मधील स्वच्छतागृह शौचालयाची अतिशय दुरावस्था झालेली असून स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे पंचायत समिती मधील कामासाठी येणाऱ्या शेकडे महिला पुरुषांना उघड्यावरती लघुशंका करण्याची वेळ येत आहे 

विशेष म्हणजे पंचायत समिती आवारामध्ये पोलीस स्टेशन , तहसील कार्यालय सभापती भवन भूमी अभिलेख कार्यालय, महिला बालविकास कार्यालय सर्व महत्त्वाचे ऑफिसेस याच आवारात असल्यामुळे कार्यालयीन कामाकरिता दररोज शेकडो लोकांची येजा होत असते. परंतु याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्षण नसून अक्षरशा स्वच्छतागृहाची परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. येथील गाळेधारकांची ही वारंवार तक्रार असते की आम्हाला स्वच्छ स्वच्छतागृह मिळावे.

स्वच्छतागृह असून त्यातील अस्वच्छतेमुळे आम्हाला बाहेर लघुशंकेला जाण्याची वेळ येत आहे.. दुसरी बाजू म्हणजे  स्वच्छता राखायची जबाबदारी ही नागरिकांची ही आहे  .उघड्यावर लघुशंकेला जाणे किंवा स्वच्छतागृहात घाण करणे यावरती दंडात्मक  कारवाई होऊ शकते..

परंतु स्वच्छतागृहाच्या साफसफाईला कामगार नसल्यामुळे स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे.याचे नियम नागरिक पाळूच शकत नाहीत, विशेष म्हणजे याच परिसरात महिला बाल विकास कार्यालय व इतर महत्त्वाची कार्यालय असल्यामुळे महिलांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यांनाही या आसुविधांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.ऐरवी तालुक्यामधील गावागावात स्वच्छतेचा संदेश घेऊन फिरणारे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच आवारातील स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे याकडे अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देऊन स्वच्छतागृहासाठी कायमस्वरूपी सफाई कामगार नेमायला हवा अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रवीण अवचर यांनी केली आहे .