ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते वारक ग्राम पंचायत हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन
माणगांव- दि. ५- तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत दि. ३ मार्च रोजी महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे यांच्यस हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
वारक कुशेडे जोड रस्ता, विघवली जोड रस्ता भूमिपूजना वेळी मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, जेष्ठ नेते महादेव बक्कम, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, वारक सरपंच वैष्णव साठे, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, होडगाव सरपंच बळीराम खाडे, वारक उपसरपंच वंदना जाधव, सदस्य केशव लोखंडे, श्रीपत कोळी, मंगल कोळी, मीना सापळे, उज्वला बेंडखले, शांता जाधव, नामदेव शिंदे, अनंत विचारे अनंत साठे, विठोबा दळवी, सचिन उभारे, विकेश सापळे, अनंत धसाडे, अनिल नाडकर, रमेश बागुल, शरद सुतार, योगेश गंभीर, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, वारक, कुशेडे, विघवली ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी ना. अदिती तटकरे यांचे स्वागत खालुबाजा लेझीमच्या तालावर करण्यात आले.
यावेळी ना. अदिती तटकरे म्हणाल्या की, फक्त तीन महिन्याच्या कालावधीत ग्राम पंचायत वारक हद्दीत दीड कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहेत. सरपंच वैष्णव साठे यांच्या माध्यमातून ग्राम पंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यात येईल. ग्राम पंचायत हद्दीतील कोणताही गाव व वाडी विकास कामांपासून वंचित राहणार नाही.




0 टिप्पण्या