आम्ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणत नाही- आ. भरत गोगावले
खरवली येथे आ. भरत गोगावले यांच्या हस्ते विविध विकासकामांची भूमिपूजने व उदघाटने
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव- दि. ११ - महाराष्ट्रात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युतीचे सरकार कार्यरत आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांची भूमिपूजने व उदघाटने आम्ही नारळ फोडून करीत नाही. आम्ही कधी ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणत नाही, असे प्रतिपादन शिसवेना पक्ष प्रतोद आ. भरत गोगावले यांनी दि. १० मार्च रोजी खरवली येथे पार पडलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी केले.
खरवली ते सुरव/निजामपूर ते खरवली रस्ता तयार करणे (१० लक्ष), खरवली ते सूरव/तळे रस्ता ग्रा. मा. २४ तयार करणे (२० लक्ष), सुरव/तळे हरिजनवाडी वस्ती रस्ता तयार करणे (१० लक्ष) या कामांचे उद्घाटने व खरवली ते आदिवासीवाडी रस्ता तयार करणे (१० लक्ष), राजिवली हरिजनवाडी रस्ता तयार करणे (१० लक्ष), बोरघर खरवली हरिजन मार्ग रस्ता तयार करणे (१० लक्ष), मौजे चेरवली स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे,खरवली वरचीआळी येथे राधाकृष्ण मंदिर सभागृह यांची भूमिपूजने तसेच मौजे साले गांव अंतर्गत रस्ता तयार करणे (३ लक्ष), मौजे सुरव/तळे येथे साकव बांधणे (१४ लक्ष), मौजे खरवली नदीवर संरक्षण भिंत बांधणे (७.५ लक्ष) या कामाचा उद्घाटने आ. भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडली. तसेच यावेळी ग्रा. पं. खरवली सरपंच संतोष खडतर, उपसरपंच निशा आडीत, सदस्य सुजित सकपाळ, योगेश शिर्के, कल्पेश मोरे, चंद्रा जगताप, शुभम जंगम, प्रदीत आडीत, सतिष ढेपे यांचा सत्कार आ. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
खा. सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नेहमीच दुसऱ्या पक्षांनी मंजूर केलेल्या विकासकामांची भूमीपूजने, उद्घाटने करण्यात पुढे असतात. ही परिस्थिती कायम असते. आम्ही शेतकरी कामगार पक्षांनी त्यांच्या सोबत असताना याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. लवकरच शिवसेनेला देखील याचा अनुभव येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्यानी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन, उदघाटने करून जनतेची दिशामुल करतो, असे प्रतिपादन खरवली येथील विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन सभेवेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश मोरे यांनी केले.
यावेळी आ. गोगवले पुढे म्हणाले की, या सरकार मार्फत विविध योजना गतिमान पद्धतीने राबविण्यात येत आहेत. हा विभाग माझ्या मतदारसंघात येत नसला तरी या विभागात विकासकामांची कमी पडू देणार नाही. सर्व विकासकामे करण्यात येतील. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय कोणी घेऊ नये असा टोला यावेळी आ. गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला.
आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून खरवली विभागामध्ये २.५० कोटी रुपयांची विकासकामे मजूर करण्यात आली आहेत. आम्ही मजूर केलेल्या विकासकामाची उदघाटने दुसऱ्या पक्षाने केली. आ. भरत गोगावले हे कधीच विकासकामांची कमी पडू देणार नाहीत. युतीमध्ये आहोत म्हणून नाहीतर विरोधकांना त्यांची जागा दाखवली असती असे खडे बोल शिसवेना तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे, माणगांव नगराध्यक्ष ज्ञानेदव पोवार, माणगांव, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, शिसवेना तालुकाप्रमुख अॅड. महेंद्र मानकर, उपजिल्हा संघटिका शर्मिला सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुकख विपुल उभारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक ऍड. सुशील दसवते, शहरप्रमुख सुनिल पवार, शहर सचिव विरेश येरुणकर, उपतालुका प्रमुख प्रशांत अधिकारी, गणपत महाडिक, महेंद्र जंगम, संतोष सकपाळ, स्वप्निल दसवते, विलास मोरे, विनोद सुतार, संजय जाधव, प्रसाद अंबूर्ले, समीर लहाने, राजाराम खडतर, समीर आडीत, दिपक तांबट, सुजित खडतर, सुनील खडतर आदी शिसवेना, शेकाप पदाधिकारी, खरवली विभाग ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





0 टिप्पण्या