पोस्को कंपनी तर्फे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

 पोस्को कंपनी तर्फे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव- दि  ११- पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या सी. एस. आर. उपक्रमांतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत भागाड, सणसवाडी, वरचीवाडी, विळे आणि साजे या ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ३०५ नागरिकांची मोतिबिंदू प्राथमिक तपासणी माणगांव येथील प्रशिक्षित तज्ञांच्या सहायाने करण्यात आली होती. तपासणीअंती ९० शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे निदान झाले. सदर ९० शस्त्रक्रिया फेब्रुवारी २०२४ अखेर पूर्ण करण्यात आल्या आहेत. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी व शस्त्रक्रियेनंतर फेरतपासणी करीता कंपनी प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली होती. 


तसेच सर्व रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले.. शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण होणेकरिता सदर ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवला.


या आधीही अश्याच प्रकारच्या मोतिबिंदू शिबिराचे आयोजन कंपनीने केले होते, आत्तापर्यंत एकूण २३८ मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मोतीबिंदूमुळे दृष्टीतील कमतरता अनेकांना अपंग / अवलंबित्व आणते अश्या स्थितीत कंपनीने यासंदर्भात घेतलेले हे पाऊल अभिनंदनीय आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या