डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव दिवस ३ रा जल्लोषात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव दिवस ३ रा जल्लोषात

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव : दि. ५ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित मा. राज्यपाल, तथा विद्यापीठाचे कुलपत्ती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित आंतर विद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव दिवस तिसरा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. तिसऱ्या दिवशीच्या सत्रा मध्ये बुद्धिबळची सेमी फायनल राऊंड, खो-खो चे १०, कबड्डी१० आणि फुटबॉलचे ०८ सामने पार पडले असून सर्व खेळाडू चुरशीने खेळले. मा. कुलगुरू डॉ. कारभारी काळे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, राजभवन नियुक्त निरीक्षण समिती अध्यक्ष डॉ. बनसोडे, आणि सदस्य डॉ. रेड्डी , डॉ. कांबळे यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपली प्रार्थनीय उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहित केले. 

 वित्त नियोजन समिती अध्यक्ष डॉ. अविनाश असनारे यांनी दिवस भर विविध खेळांची आणि सुविधांची पाहणी करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात कोकणातील जाखडी नृत्य खेळाडूंसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरली. राज्यपाल ऑफिसच्या नियुक्त समितीने प्रा डॉ. कारभारी काळे यांचा सत्कार करून विद्यापीठ कर्मचारी व आयोजनाबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले. विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे समन्वयक डॉ. कराड, प्रा. पुलचवाड , काळसेकर हे संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व आयोजनाची भूमिका मा. कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत आहेत.

 याकरिता क्रीडा विभागातील सहसमन्वयक गोरेगावकर , पाटील , भिंगारे , घोसाळकर, वारे, उतेकर व स्पोर्ट इन्स्ट्रक्टर हासे, भोईर हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत , विलास चव्हाण विद्यापीठ अभियंता यांची टीम सर्व मैदानांची देखभाल करीत आहेत .सर्व क्रीडाप्रेमींनी स्पर्धा बघण्याचा आस्वाद घ्यावा अशी कुलसचिव डॉ.किवळेकर, अंबपकर वित्त अधिकारी यांनी आवाहन केले आहे. हेमंत वाशीकर हे विद्युत रोषणाईची श्रुकर सांभाळत आहेत. प्रथमोपचार आरोग्य केंद्र च्या डॉ. वाघमारे आणि डॉ. .नलबलवार मॅडम व त्यांची टीम उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देत आहेत .विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे समन्वयक डॉ. कराड , प्रा पुचलवाड , काळसेकर डॉ. वरखडे, डॉ,मेजर भगत ,डॉ. वराडकर, डॉ. पोरे ,डॉ.पावडे, डॉ. जोशी, डॉ. शेष ,डॉ,वाघमारे ,डॉ. मुजावर डॉ. दाहोत्रे डॉ.कुंभार ,डॉ. नलबलवार, डॉ. अय्यर ,डॉ.सुतार, डॉ.म्हात्रे ,डॉ. सदैया आणि प्रसाद पेंडसे या सर्व समन्वयक क्रीडा महोत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या