डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव दिवस दुसरा जल्लोषात.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. ४ - दुसऱ्या दिवशीच्या सत्रा मध्ये विविध विद्यापीठातील सामने खेळीमेळीच्या व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. या यामध्ये कबड्डी खो-खो फुटबॉल व बुद्धिबळ या खेळांचा समावेश असून झालेल्या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत बुद्धिबळाचे तीन फेऱ्या पूर्ण असून सर्व स्पर्धक आपापल्या परीने उत्कृष्टपणे खेळ खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच खो-खोच्या स्पर्धेमध्ये दोन दिवसाच्या सत्रामध्ये एकत्रित ३६ सामने झाले. आत्तापर्यंत मुंबई, पुणे ,कोल्हापूर, नांदेड व नागपूर येथील विद्यापीठांच्या संघांनी आपले वर्चस्व राखले. या सर्व सामन्यांमध्ये मुले व मुली यांचे सामने अतितटीचे होत आहेत. तसेच खेळाडूंना प्रेक्षकांचा व परिसरातील नागरिक व विद्यार्थी हे उत्स्फूर्त पाठिंबा देऊन खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच , कबड्डीच्या मुले आणि मुलींचे ३० सामने झाले. सामने कबड्डी मॅटवर खेळवण्यात येत असून दिवस रात्र चालणाऱ्या या रोमहर्षक सामन्यांचा प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत.
या क्रीडा महोत्सव मध्ये सुमारे सतराशे विद्यार्थी व २०० संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. या सर्वांचे राहण्याची व जेवणाची व्यवस्था विद्यापीठ परिसरामध्ये उत्तम प्रकारे करण्यात आली असल्याचे विद्यापीठ मार्फत सांगण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ.एस एल नलबलवार आणि डॉ. सचिन पोरे विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक शिवाजी कराड, प्रा बालाजी पुलचवाड, प्रा जाधव, काळसेकर , आणि क्रीडा विभागातील सर्व सह समन्वयक आणि कर्मचारी तसेच तसेच विविध समित्यांचे समन्वयक आणि सदस्य तथा कुलगुरू व कुलसचिव कार्यालयातील सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.




0 टिप्पण्या